राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; गुरुपौर्णिमेपासून ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम’ सुरू होणार

223
राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; गुरुपौर्णिमेपासून 'राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम' सुरू होणार
राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; गुरुपौर्णिमेपासून 'राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम' सुरू होणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात ३ लाख ५० हजार शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोढा म्हणाले, ‘अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.’

(हेही वाचा – अजित पवारांनी शरद पवारांसमोर मनातलं दुःख केलं व्यक्त: म्हणाले, एकट्याच्या बळावर…)

सामंजस्य करार

महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर अव्यावसायिक तत्वावर बुधवारी मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. वेळोवेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संस्‍था यांच्यासोबत आवश्यकतेनुसार सामजंस्य करार करण्यात येतील. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये ४० लाख बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.