पृथ्वीराज चव्हाण यांना चार वर्षांपासून भेटले नाहीत राहुल गांधी

83

आपण जेव्हा जेव्हा दिल्लीत जातो, तेव्हा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटतो, परंतु मागील ४ वर्षे माझी राहुल गांधी यांच्याशी भेट झाली नाही, अशी धक्कादायक माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

आपण जेव्हा दिल्लीत राहतो तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना नक्की भेटतो. त्यांची तब्येत सध्या पूर्वीसारखी नसली, तरी ते नेहमी बोलतात, आपण सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली, तेव्हा त्याही मला भेटल्या. पण जवळपास 4 वर्षे झाली, या काळात मी राहुल गांधींना भेटू शकलो नाही, असे चव्हाण म्हणाले. अशा प्रकारे काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी करणाऱ्या आणि गांधी कुटुंबाला विरोध करणाऱ्या पक्षाच्या G-23 गटातील आणखी एका नेत्याने पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा मध्य रेल्वे मार्गावर सलग ३ दिवस मेगाब्लॉक)

आत्मपरीक्षणास काँग्रेसचे नेतृत्व तयार नाही

उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. मात्र पक्षातील काही नेत्यांच्या बोलण्यातून त्यांना आत्मपरीक्षणाची गरज नसल्याचे जाणवले. चिंतन शिबिरात प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे होते, असे माझे मत आहे. एखाद्याला लक्ष्य करण्यापेक्षा अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.