मध्य रेल्वे मार्गावर सलग ३ दिवस मेगाब्लॉक

96

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज गर्डर काढण्यासाठी आणि ठाकुर्ली स्थानकावरील एन-टाइप जुना फूट ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार,शनिवारी आणि रविवार असे सलग तीन दिवस रात्री मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : आता CSMT स्थानकातही Pod Style hotel; 500 रुपयांत 12 तास राहू शकता )

ब्लॉक-1

येत्या शुक्रवार – शनिवारी ( ३, ४ जून २०२२) भायखळा – माटुंगा जलद मार्गावर मध्यरात्री ००.४० ते ०६.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्गबदल

मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस (22105 इंद्रायणी एक्स्प्रेस) भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद मार्गावरील उपनगरीय लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार स्थानकांवर थांबून माटुंगा आणि भायखळा दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

ब्लॉक-2

येत्या शनिवार – रविवारी मध्यरात्री ००.४० ते ०५.४० पर्यंत भायखळा – माटुंगा जलद मार्गावर मेगाब्लॉक

मेल/एक्स्प्रेसचे मार्गबदल

12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

उपनगरीय गाड्यांचे मार्गबदल

ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील उपनगरीय सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील.

ब्लॉक-3

येत्या शनिवार – रविवारी मध्यरात्री ०१.१५ ते पहाटे ०३.३५ पर्यंत कल्याण – दिवा जलद/धीम्या मार्गावर मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजल्यापासून ००.२४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या (४ लोकलसेवा)जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कोपर व ठाकुर्ली या स्थानकांवर थांबणार नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.