PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल

124
Lok Sabha Election 2024 : भाजप तिसऱ्यांदा जिंकणार की...
Lok Sabha Election 2024 : भाजप तिसऱ्यांदा जिंकणार की...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पुण्याच्या दौऱ्यावर येत असल्याने वाहतूकीत बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले आहे.

त्यादिवशी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजे दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड इत्यादी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल होतील.

(हेही वाचा – Western Local Train : पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत; नोकरदारांच्या अडचणीत वाढ)

वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.