Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांकडूनच गोळीबार; ४ जणांचा मृत्यू

मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

109
Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांकडूनच गोळीबार; ४ जणांचा मृत्यू

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) रेल्वे पोलिसांकडूनच गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज म्हणजेच सोमवार ३१ जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे आरपीएफ कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केला असून त्याला सध्या ताब्यात घेतलं आहे. मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन (Jaipur Express Firing) राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये येताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात चार जण जागीच ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल इथे दाखल झाली आहे.

(हेही वाचा – Western Local Train : पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत; नोकरदारांच्या अडचणीत वाढ)

नेमका प्रकार काय?

आरपीएफ (Jaipur Express Firing) हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांच्या दिशेने बंदूक उगारली. मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु रागात असलेल्या चेतन सिंह याने कोणाचेही ऐकले नाही. तसेच त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर त्याने गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

राजस्थान ते मुंबई सेंट्रल या जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) आज पहाटे पाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. ट्रेन पालघरमध्ये पोहोचताच B-5 डब्यात अचानक गोळीबाराचा आवाज झाला. आरपीएफ जवानानेच सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.