Pravin Darekar यांचे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्षपद बेकायदेशीर, संघटनेच्या नावातून महाराष्ट्र काढून टाका; कायदेतज्ज्ञांचे मत

प्रवीण दरेकर यांच्या निवडीच्या वेळी नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन म्हणजेच एनएसएफने घालून दिलेल्या नियमावलीचे तसेच न्यायालयाच्या आदेशाचे देखील उल्लंघन झाले आहे. यामुळे प्रवीण दरेकर यांचा दावा बेकायदेशीर आहे.  त्यांच्या संघटनेच्या नावातून महाराष्ट्र हे नाव वगळणेच योग्य ठरेल असे पांडे यांनी स्पष्ट केले.

106
Pravin Darekar during a public event.
Pravin Darekar faces allegations regarding his boxing association role.

मुंबई बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा वाद आता चांगलाच चिघळतो आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे आणि भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यात वाद पेटला आहे. याच संदर्भात विधीज्ञ सतीश पांडे यांनी मत मांडले की, राहुल शेवाळे यांचे अध्यक्षपद, त्यांची संघटना आणि त्यांच्या नेतृत्त्वात काम करणारी कार्यकारिणी हीच अधिकृत आहे. प्रवीण दरेकर यांच्या निवडीच्या वेळी नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन म्हणजेच एनएसएफने घालून दिलेल्या नियमावलीचे तसेच न्यायालयाच्या आदेशाचे देखील उल्लंघन झाले आहे. यामुळे प्रवीण दरेकर यांचा दावा बेकायदेशीर आहे.  त्यांच्या संघटनेच्या नावातून महाराष्ट्र हे नाव वगळणेच योग्य ठरेल असे पांडे यांनी स्पष्ट केले.

विधीज्ञ सतीश पांडे म्हणाले की, नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स अॅक्ट २०२५ च्या भाग १०च्या कलम २७ उपकलम ३ अनुसार कुठलीही संघटना एखाद्या विशिष्ट राज्याचे प्रतिनिधीत्त्व केव्हा करु शकते या बद्दलचे नियम दिले आहेत. यामध्ये स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय पातळीवरची नियामक संघटना जेव्हा एखाद्या संघटनेला राज्याची अधिकृत संघटना म्हणून मान्यता देते तेव्हाच ती संघटना त्या राज्याचे प्रतिनिधीत्त्व करु शकते. बॉक्सिंग क्षेत्रातील अशी नियामक संस्था ही बीएफआय आहे आणि बीएफआयने अशी अधिकृत मान्यता ही राहुल शेवाळे यांच्या अध्यक्षतेखालील संघटनेला दिली आहे. त्यामुळे हीच संघटना अधिकृत आहे आणि त्यांच्या संघटनेलाच महाराष्ट्र हे नाव आपल्या संघटनेच्या नावात वापरण्याचा अधिकार आहे. (Pravin Darekar)

(हेही वाचा दरेकर, माझ्या भविष्याची चिंता करायला एकनाथ शिंदे समर्थ, तुम्ही चिंता करु नका; Rahul Shewale यांचा टोला)

पांडे यांनी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची अध्यक्षपदाची जी निवड आहे ती बेकायदेशीर कशी हे स्पष्ट केले. मुळात नोव्हेंबर महिन्यात धर्मादाय आयुक्तांकडून महाराष्ट्र बॉक्सिंग फेडरेशनची निवडणुक जाहीर करण्यात आली होती. त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्याचा निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले होते की, १२ ऑक्टोबर २०२५ ला जी घटनादुरुस्ती झाली होती बीएफआयच्या घटनेला सुसंगत होती आणि यानुसारच निवडणुका घेतल्या जाव्यात. परंतु धर्मादाय आयु्क्तांनी न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवून २०२० च्या घटनेनुसारच निवडणुका घेतल्या आणि त्यामुळेच त्या निवडणुका रद्दबातल ठरविल्या गेल्या आहेत. याशिवाय दरेकरांची कार्यकारिणी ही बीएफआयच्या घटनेला अनुसरुन नाही त्यामुळे आपोआपच त्यांची संघटना आणि त्यांचे अध्यक्षपद रद्द होते.

हे पाहता प्रवीण दरेकरांचे (Pravin Darekar) सर्वच दावे हे पूर्णपणे निराधार असल्याचे दिसते. त्यामुळे निव्वळ राजकारणासाठीच त्यांचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. आता पुढे प्रवीण दरेकर या सर्व निवडप्रक्रियेला आव्हान देतात का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.