Pranab Mukherjee : प्रणवदा खुशामत करणारे नव्हते; म्हणून राजीव गांधींनी दिले नाही मंत्रीमंडळात स्थान

Pranab Mukherjee - Sharmistha Mukherjee : 'प्रणव माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स' या शर्मिष्ठा मुखर्जी लिखित पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

168
Pranab Mukherjee : प्रणवदा खुशामत करणारे नव्हते; म्हणून राजीव गांधींनी दिले नाही मंत्रीमंडळात स्थान
Pranab Mukherjee : प्रणवदा खुशामत करणारे नव्हते; म्हणून राजीव गांधींनी दिले नाही मंत्रीमंडळात स्थान

काॅंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्वत:च्या वडिलांच्या काळातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. ‘प्रणव माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ (Pranab My Father : A Daughter Remembers) या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. काॅंग्रेसचे एकनिष्ठ नेते अशीच ओळख असलेले प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या जीवनातील धक्कादायक खुलासे या पुस्तकात करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Drug Case : सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस)

शर्मिष्ठा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वडिलांच्या डायरीत लिहिलेल्या गोष्टींच्या आधारे ‘प्रणव माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात राहुल गांधींशी (Rahul Gandhi) संबंधित फारच कमी माहिती आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला काँग्रेस नेते पी चिदंबरम उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीमप्रमाणे काम

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) यांनी या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांचे वडील खुशामत करणारे नव्हते, त्यामुळेच राजीव गांधींनी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या कार्यकाळात केलेले काम हा त्यांच्या राजकीय जीवनाचा सुवर्णकाळ असल्याचे त्यांचे वडील म्हणायचे. त्यांनी असेही म्हटले की, ते राष्ट्रपती असतांना त्यांचे वडील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका टीमप्रमाणे काम केले होते.

(हेही वाचा – Crime : ग्रँटरोडच्या आर्यन बार मध्ये गाण्यावरून दोन गटात राडा )

राहुल गांधींनी अध्यादेशाची प्रत फाडल्यानंतर झाला होता संताप

शर्मिष्ठा यांनी राहुल गांधींबाबत वडिलांचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील अध्यादेशाच्या विरोधात होते, ज्याची प्रत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सप्टेंबर 2013 मध्ये पत्रकार परिषदेत फाडली होती. शर्मिष्ठा म्हणाल्या की, मीच त्यांना अध्यादेश फाडल्याची बातमी सांगितली होती. त्यांना खूप राग आला. यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती, असे त्यांचे वडील म्हणाले.

लोकशाही म्हणजे मोकळेपणाने संवाद साधता येणे

या पुस्तकावर माजी नोकरशहा पवन के वर्मा यांच्याशी झालेल्या संभाषणात शर्मिष्ठा यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गेले होते, तेव्हा त्यांनी विरोध केला होता. शर्मिष्ठा (Sharmistha Mukherjee) म्हणाल्या की, मी बाबांशी तीन-चार दिवस बोलले नाही. एके दिवशी बाबा म्हणाले की, मी या कार्यक्रमाला जाण्याचे समर्थन करत नाही, तर देश त्याचे समर्थन करत आहे. लोकशाही म्हणजे मोकळेपणाने संवाद साधता येणे, असे बाबांचे मत होते.

या पुस्तकावर देशभरात बरीच चर्चा सुरु आहे. तसेच दिवसेंदिवस प्रणवदा (Pranab Mukherjee) यांच्याविषयी नवनवीन खुलासे Pranab My Father : A Daughter Remembers या पुस्तकात करण्यात आले आहे. राजकीय वर्तुळात देखील या पुस्तकाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.