Crime : ग्रँटरोडच्या आर्यन बार मध्ये गाण्यावरून दोन गटात राडा 

176
Crime : ग्रँटरोडच्या आर्यन बार मध्ये गाण्यावरून दोन गटात राडा 
Crime : ग्रँटरोडच्या आर्यन बार मध्ये गाण्यावरून दोन गटात राडा 
ग्रॅंटरोडच्या ‘आर्यन ऑर्केस्ट्रा’ बारमध्ये धार्मिक गाण्यावरून बार कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत बार मॅनेजरसह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी परस्परांविरोधी (Crime) दंगल, हत्येचा प्रयत्न धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही गटातील ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील ग्रँटरोड, त्रिभुवन रोड वर असलेल्या ‘आर्यन ऑर्केस्ट्रा बार’मध्ये २५ जुलै रोजी मद्यप्राशनासाठी नियमित येणारा मोहम्मद सिद्दीकी हुसेन याने धार्मिक गाण्यावरून मॅनेजर अमरजित सिंग याच्यासोबत वाद घालून गाणे बंद करायला लावले होते. हे गाणे काही ग्राहकांच्या फर्माईशवरून सादर करण्यात आले होते, त्या गाण्याला मोहम्मद सिद्दिकी याने आक्षेप घेऊन गाणे बंद करायला लावले होते. त्यानंतर मोहम्मद सिद्दिकी (Crime) आणि त्याच्या साथीदाराने बारमध्ये शिवीगाळ करून करून बघून घेण्याची धमकी देऊन निघून गेला होता.

(हेही वाचा-Military Schools : छात्रसैनिकांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी सैनिकी शाळा कटीबद्ध)

९ डिसेंबर रोजी मोहम्मद शेख हा पाच ते सहा जणांना घेऊन बारमध्ये आला व त्याने धार्मिक गाण्याच्या वादातून बारमध्ये घुसून बार मॅनेजर नितीश राजेश राय आणि अमरजित यांना शिवीगाळ करून सोबत आणलेल्या हत्याराने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान बार मधील कर्मचारी यांनी देखील मॅनेजरच्या बचावासाठी मोहम्मद सिद्दिकी आणि त्याच्या साथीदारांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

रात्रीच्या सुमारास बारमध्ये सुरू असलेल्या राड्यामुळे ग्राहकामध्ये पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच डी. बी. मार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन राडा करणाऱ्यांची धरपकड करून काही जणांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले, जखमींना उपचारासाठी (Crime) जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या राड्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटावर खुनाचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही गटातील चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=7-QKCruvZ9g

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.