Bihar : घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करणार ही ‘मोदींची हमी’ आहे. देशात कायद्याचे राज्य कायम राहील, असे विधान पंतप्रधान मोदींनी बिहारमधील पूर्णिया येथील जाहीर सभेत केले.(Bihar) येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. देशात फक्त भारतीय कायदाच चालेल, घुसखोरांची मनमानी नाही, असे म्हणत काँग्रेस-राजदला खुले आव्हान दिले आहे.(Bihar)
(हेही वाचा Report : चीन सीमेजवळ भारताचा मास्टर प्लॅन; ईशान्य सीमेवर ३.४ अब्ज डॉलर्सच्या रेल्वे प्रकल्पाची योजना )
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ ला बिहारमधील पूर्णिया येथे काँग्रेस आणि राजद या विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, हे पक्ष परदेशी घुसखोरांना वाचवण्यासाठी रॅली काढत असून देशाची सुरक्षा आणि संसाधने धोक्यात आणत आहेत. तसेच, बिहारचे लोक विरोधकांच्या घुसखोरीला समर्थन देणाऱ्या मुद्द्यांना स्वतः उत्तर देतील, असेही पंतप्रधान म्हणाले.(Bihar)
बिहार के लोगों का जीवन आसान बनाने के लिए डबल इंजन सरकार लगातार काम कर रही है। आज पूर्णिया से हजारों करोड़ रुपये के विकास कार्यों का लोकार्पण-शिलान्यास कर अत्यंत प्रसन्न हूं। https://t.co/mHT2VGjbOV
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2025
(हेही वाचा ‘हे सहन केले जाणार नाही…’; वांशिक भेदभावाविरोधात पंतप्रधान Keir Starmer यांनी कुणाला अल्टिमेटम दिला? )
पंतप्रधान मोदी म्हणाले, घुसखोरांना देशातून हाकलून लावणे ही एनडीएची जबाबदारी असून यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विरोधकांना आव्हान देताना पंतप्रधान म्हणाले, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भारतात फक्त भारतीय कायदाच चालेल, घुसखोरांची मनमानी नाही. घुसखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि देशाला त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास पंतप्रधानांनी बिहारमधील जनतेला दिला.(Bihar)
Join Our WhatsApp Community

