PM Narendra Modi : केरळमध्ये लोक घाबरलेले आहेत

केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. पुजारीही हिंसाचाराला बळी पडतात. अनेक महाविद्यालयीन परिसर साम्यवादी गुंडांची वस्ती बनले आहेत.

173
PM Narendra Modi : कॉंग्रेसची नेहमी विकासविरोधी भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी (१५ मार्च) केरळच्या पठाणमथिट्टा येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी केरळमध्ये कमळ फुलणार असल्याचा भाजपाने दावा केला आहे. भाजप येथील तरुणांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे केरळच्या जनतेचे म्हणणे आहे की, यावेळी हा आकडा ४०० च्या पुढे गेला आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र, १० वर्षांच्या कामगिरीचा केला उल्लेख)

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान ?
केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली :

केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. पुजारीही हिंसाचाराला बळी पडतात. अनेक महाविद्यालयीन परिसर साम्यवादी गुंडांची वस्ती बनले आहेत. महिला, तरुण आणि सर्व स्तरातील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत आणि राज्य सरकारमध्ये बसलेले लोक शांतपणे झोपत आहेत. काँग्रेस आणि एलडीएफचे चक्र येथूनच संपुष्टात येईल, तेव्हा या समस्यांचे निराकरण होईल, असे मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा – Amit Shah : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १५ ते १८ मार्च दरम्यान दक्षिण भारत दौरा करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.