महिला आरक्षणावर PM मोदींचा ठाम निर्धार; विशेष अधिवेशनापूर्वी नारी शक्तीसाठी खास संदेश! काय म्हणाले?

महिला आरक्षणावर PM मोदींचा ठाम निर्धार; विशेष अधिवेशनापूर्वी नारी शक्तीसाठी खास संदेश! काय म्हणाले?

1
महिला आरक्षणावर PM मोदींचा ठाम निर्धार; विशेष अधिवेशनापूर्वी नारी शक्तीसाठी खास संदेश! काय म्हणाले?
महिला आरक्षणावर PM मोदींचा ठाम निर्धार; विशेष अधिवेशनापूर्वी नारी शक्तीसाठी खास संदेश! काय म्हणाले?

PM Modi on Women’s Reservation Bill : देशातील महिला सक्षमीकरण आणि राजकीय क्षेत्रात महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत महिला आरक्षणाबाबत सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. “आम्ही नारी शक्तीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

महिलांना राजकीय प्रक्रियेत समान संधी आणि योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशातून अधोरेखित केले. महिला सक्षमीकरण हे केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून ते साध्य करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.  पंतप्रधान मोदींनी शनिवारी दुपारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही आमच्या ‘महिला शक्ती’ला एक वचन दिले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” यासोबतच पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणासंदर्भात स्वतःचा एक जुना व्हिडिओही शेअर केला. या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले, “महिलांच्या सहभागासाठीचा लढा अनेक दशकांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून मी सुद्धा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक आहे. अनेक महिलांनी माझ्यासमोर हा मुद्दा मांडला आहे. अनेक भगिनींनी मला पत्रांद्वारे सर्व काही सांगितले आहे.”

ते म्हणाले, “मला माहित आहे की आम्हाला देशातील १००% महिलांचा आशीर्वाद आहे. मी देशातील प्रत्येक महिलेला आश्वासन देतो की महिला आरक्षणाच्या मार्गात उभा असलेला प्रत्येक अडथळा आम्ही दूर करू. आमचा उत्साह उंचावलेला आहे, आमचे धैर्य अढळ आहे आणि आमचा निर्धारही अढळ आहे. महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष देशातील महिला शक्तीला संसद आणि विधानसभेतील आपला सहभाग वाढवण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत, ही केवळ काळाची बाब आहे.”

काय आहे महिला आरक्षण विधेयक?

सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मंजूर केला. या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे देशातील महिलांना राजकीय निर्णयप्रक्रियेत अधिक प्रभावी सहभाग मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. मात्र, या आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार असल्याने त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

विशेष अधिवेशनात काय घडणार?

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. आरक्षणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभेतील जागांची संख्या यांसारखे मुद्देही चर्चेत येऊ शकतात. महिला आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यास संसद आणि विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीयरीत्या वाढू शकते. त्यामुळे धोरणनिर्मिती, सामाजिक विकास आणि महिलांशी संबंधित प्रश्नांना निर्णयप्रक्रियेत अधिक महत्त्व मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.