‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’; एकनाथ शिंदे मोदींच्या मार्गावर?

101

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी महिलांचा विचार केला. महिलांच्या समस्या मोदींना कळल्या. शौचालय बांधण्याचा जो ध्यास आहे, तो याच जाणिवेतून घेतला आहे. त्यानंतर गॅस कनेक्शन इत्यादि गोष्टींद्वारे त्यांनी महिलांना आधार दिला. महाराष्ट्रात आता ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी बजावली आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे.

( हेही वाचा : शीव कोळीवाड्यात तीन पक्षांचे नगरसेवक,आमदार, खासदार एकाच कार्यक्रमात)

विशेष म्हणजे या अभियानाविषयी एकनाथ शिंदे म्हणाले की, “२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान चालणा-या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरुक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी, असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्यक तपासणी करुन घ्यावी, अशी विनंती आपल्याला करत आहे”

आरोग्यदायी नवरात्री साजरी करण्याचे आवाहन

स्त्रिया बर्‍याचदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ४० नंतर त्यांना सतावणार्‍या समस्या त्रासदायक असतात. अशावेळी या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. नवरात्रीतले ९ दिवस देवीची उपासना करण्याचे दिवस आहेत. हा स्त्री शक्तीचा जागर आहे. या दरम्यान श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडचं आयोजन केलं जातं. ही राष्ट्रीय नवरात्र असल्याचं भिडे गुरुजी म्हणतात. आता त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी आरोग्यदायी नवरात्री साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता या विषयाकडे महाराष्ट्रीय जनतेने गांभिर्याने पाहिलं पाहिजे. स्त्रिचे खांदे वरवर पाहता नाजूक वाटले तरी या घराच्या चार भिंती तिच्याच खांद्यांवर उभ्या असतात. आजची स्त्री नोकरी, उद्योग करते आणि घरातही लक्ष घालते. ती गृहलक्ष्मी तर आहेच परंतु कुटुंबाला सांभाळणारी खंबीर आधुनिक स्त्री देखील आहे.

म्हणूनच तिच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देणं हे घरातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो. पण तिच्या प्रकइतीकडे मात्र दुर्लक्ष होतं. या धरतीवर ’माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान महत्वाचं ठरणार आहे. बरोड्याच्या सयाजीराव गायकवाड महाराज यांनी शौचालय उभे करुन स्त्रिला मोठ्या त्रासातून मुक्त केलं. हाच आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि आता एकनाथ शिंदे मोदींच्या मार्गावर चालत आहेत. ही उल्लेखनीय कृती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.