गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत मराठी भाषा भवनाची पायाभरणी

87

मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी मराठी भाषा भवन उभारले जाणार असून येत्या २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या भवनाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

१०० कोटी रुपयांची तरतूद

मुंबईमध्ये मराठी भाषा भवन हे महापालिकेच्यावतीने बनवण्यात येणार होते आणि यासाठी मागील दोन वर्षांपासून तत्कालिन सत्ताधारी शिवसेनेकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्यावतीने बनवण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाचा मुद्दा आता सरकारकडून हायजॅक करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पातून मराठी भाषा भवनाचा मुद्दा वगळण्यात आला आहे. आता सरकारच्यावतीने मराठी भाषा भवनाची निर्मिती केली जात असून यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली.

(हेही वाचा Maharashtra Budget Session 2022 : अजित पवारांची ‘डॉलर’ भाषा)

नवी मुंबईत मराठी भाषा संशोधन उपकेंद्र 

येत्या २ एप्रिल रोजी अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या भवनाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. याशिवाय नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषा संशोधन उपकेंद्र बनवण्यात येणार असून त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशीर असून या चळवळीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रपतींना १ लाख २० हजार पोस्टकार्ड पाठवली आहे. राज्याच्या या भावनेला केंद्र शासनाकडून सुयोग्य प्रतिसाद मिळेल,अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.