NDA Govt : महापौर ते केंद्रात मंत्रीपद! दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन

143
NDA Govt : महापौर ते केंद्रात मंत्रीपद! दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन
NDA Govt : महापौर ते केंद्रात मंत्रीपद! दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन

भाजपचे नेते तथा एनडीएचे (NDA Govt) गटनेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या या सरकारमध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी महाराष्ट्रातील चार खासदारांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं सांगण्यात येत आहे. आता यामध्ये आणखी एका नेत्याचा समावेश झाला आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन गेल्याचं सांगण्यात येत आहे. (NDA Govt)

(हेही वाचा –Shiv Sena Bhavan Banner : शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावून भाजपाने उद्धव ठाकरे यांना डिवचले!)

पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांचा मोदी ३ मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत नितीन गडकरी. पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव. रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना फोन आले आहेत. (NDA Govt)

(हेही वाचा –NDA Govt : मोदींच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?)

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात सहभाग होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. (NDA Govt)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.