Narendra Modi Oath Ceremony : NDA च्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे? आतापर्यंत ३७ खासदारांच्या नावावर शिक्कामोर्तब

237
Modi Ka Pariwarला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंतप्रधान म्हणाले...
Modi Ka Pariwarला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंतप्रधान म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी (Narendra Modi Oath Ceremony) होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यलयातून अनेक खासदारांना फोन गेले आहेत. (Narendra Modi Oath Ceremony)

(हेही वाचा –NDA Govt : महापौर ते केंद्रात मंत्रीपद! दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन)

आतापर्यंत 32 जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांनाही फोन आला आहे. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडणार आहे. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांसोबत मंत्रिपरिषदेत संधी देण्याबद्दल बोलले आहे. त्यानंतरच नावे फायनल झाली असून आता कॉल्स येऊ लागले आहेत. या खासदारांनाही आजच शपथ घेता देण्यात येणार आहे. (Narendra Modi Oath Ceremony)

कुणाकुणाला मंत्री पदाच्या शपथेसाठी फोन?

१. जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
२. जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
३. अनुप्रिया पटेल, अपना दल
४. डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
५. के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
६. नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
७. राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
८. अमित शाह, भारतीय जनता पार्टी
९. अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
१०. राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
११. एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
१२. सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
१३. चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
१४. मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
१५. पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड)
१६. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
१७. ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
१८. प्रतापराव जाधव, शिवसेना
१९. कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी
२०. रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी
२१. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२२. के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड)
२३. मनोहरलाल खट्टर, भाजप
२४. राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी
२५. सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी
२६. ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी
२८. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी
२९. किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी
३०. बंदी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी
३१. गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी
३१. रवनीत बिट्टू,भारतीय जनता पार्टी
३२. निर्मला सीतारमन,भारतीय जनता पार्टी
३३. अन्नपूर्णा देवी,भारतीय जनता पार्टी
३४. सीआर पाटिल, भारतीय जनता पार्टी
३५. अजय टम्टा, भारतीय जनता पार्टी
३६. एस. जयशंकर, भारतीय जनता पार्टी
३७. जे. पी. नड्डा, भारतीय जनता पार्टीदाच्या शपथेसाठी फोन?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.