- विशेष प्रतिनिधी
NCP Women State President : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला संघटनेच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या महिला संघटनेला नवे नेतृत्व मिळाले आहे.
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्यानंतर हे पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदासाठी पक्षातील अनेक महिला नेत्यांची नावे चर्चेत होती. विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू असतानाच अखेर पक्ष नेतृत्वाने वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. (NCP Women State President)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर दीर्घकाळ काम केलेल्या नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस यांसह विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महिला संघटनेतील आक्रमक आणि सक्रिय नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. (NCP Women State President)
(हेही वाचा – Rohit Sharma Selectors Controversy : रोहित शर्मावरुन अजित आगरकरवरच टांगती तलवार?)
वैशाली नागवडे यांचा राजकीय प्रवासही उल्लेखनीय राहिला आहे. १९९९ मध्ये जिल्हा बँकेच्या कामानिमित्त नागवडे कुटुंबीयांचा अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर २००२ मध्ये त्यांची अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली. पुढे २००५ मध्ये महानंदाच्या संचालिका, २००७ मध्ये दौंड पंचायत समिती सदस्य, २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले. २०१० मध्ये पुन्हा महानंदाच्या संचालकपदी त्यांची निवड झाली, तर २०१३ मध्ये त्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. याच काळात उत्तर प्रदेशातील IVRI, बरेली संस्थेच्या संचालकपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. (NCP Women State President)
२०१७ आणि २०२० मध्ये त्यांनी राहू-खामगाव मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. पक्ष संघटनेतील त्यांची सक्रियता आणि सातत्यपूर्ण कामामुळे त्यांच्याकडे महिला संघटनेच्या नेतृत्वासाठी सक्षम पर्याय म्हणून पाहिले जात होते.
पक्षातील अंतर्गत घडामोडींमध्येही वैशाली नागवडे यांची भूमिका अनेकदा चर्चेत राहिली आहे. काही मुद्द्यांवर त्यांनी तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेशी मतभेद व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती ही केवळ संघटनात्मक बदल नसून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात मानली जात आहे. (NCP Women State President)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला संघटना अधिक सक्षम करण्याचे मोठे आव्हान आता वैशाली नागवडे यांच्यासमोर असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष महिला संघटनेत कोणते बदल करतो आणि संघटन विस्ताराला किती गती मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (NCP Women State President)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

