Sharad Pawar : राष्ट्रवादीला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष; संघटनात्मक निवडणुका घेण्याची शरद पवार यांची सूचना

जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परिणामी नवीन अध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे.

151
Sharad Pawar : राष्ट्रवादीला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष; संघटनात्मक निवडणुका घेण्याची शरद पवार यांची सूचना

राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संघटनात्मक निवडणुका घेण्याची सूचना केली असून, त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनात्मक निवडणुका घेण्याची सूचना त्यांनी केली. त्यासाठी दिलीप वळसे-पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर यांची अनुक्रमे राज्य आणि मुंबईच्या संघटनात्मक निवडणुकांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे दोन निवडणूक निर्णय अधिकारी राज्य आणि मुंबईतील संघटनात्मक निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करतील.

(हेही वाचा – राऊतांच्या अडचणी वाढणार; ‘हक्कभंग’ प्रकरण राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे)

बैठकीला प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या (Sharad Pawar) २४व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम १० जून रोजी नगरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तसेच राज्यभर ठिकठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

हेही पहा – 

जयंत पाटलांचा कार्यकाळ पूर्ण

जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परिणामी नवीन अध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. तसेच नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद रिक्त आहे. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, अजित पवार यांची पक्षावरील (Sharad Pawar) पकड पाहता, त्यांच्या गटातील नेत्यालाच यावेळी संधी मिळेल, असे चित्र आहे. सध्या राजेश टोपे, धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. त्यात राजेश टोपे यांचे पारडे जड मानले जात आहे. आरोग्यमंत्री म्हणून कोरोनाकाळ त्यांनी केलेले काम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांना संधी दिल्यास ते सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून पुढे येऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.