उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग अंगीकारल्यामुळे संजय राऊतांकडून लव्ह जिहादचा प्रचार; सोमय्यांची जहरी टीका

149
उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग अंगीकारल्यामुळे संजय राऊतांकडून लव्ह जिहादचा प्रचार; सोमय्यांची जहरी टीका
उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग अंगीकारल्यामुळे संजय राऊतांकडून लव्ह जिहादचा प्रचार; सोमय्यांची जहरी टीका

त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेचे सध्या पडसाद उमटताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळात या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहेत. अशात याच पार्श्वभूमीवर बोलत असताना भाजप नेते किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंसह, खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग अंगीकारल्यामुळे संजय राऊत लव्ह जिहादचा प्रचार करत आहेत, अशी टीका सोमय्यांनी गुरुवारी, एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

नक्की काय म्हणाले सोमय्या?

त्र्यंबकेश्वर मंदिरातील घडलेल्या घटनेविषयी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती. ‘हिंदू मुस्लिमांनामध्ये तेढ निर्माण करण्याच काम भाजप आणि भाजपच्या टोळ्यांकडून केले जात आहे, असे राऊत म्हणाले होते.’ राऊतांच्या याच टीकेला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘बाळासाहेबांनी संपूर्ण शिवसेनेला भगव वस्त्र धारण केले होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्यासाठी हिरवा रंग अंगीकार केला आहे. त्याचा प्रचार केला जातो आहे. त्यामुळे संजय राऊत लव्ह जिहादचा प्रचार करत आहेत.’

(हेही वाचा – राऊतांच्या अडचणी वाढणार; ‘हक्कभंग’ प्रकरण राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे)

उद्धव ठाकरेंनी फक्त मंत्र्यांच्या विकासाचे केले काम 

पुढे सोमय्या म्हणाले की, ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होत आहे, याची सुरुवात झाली आहे. आता विकासाच्या दृष्टीने विकासाची दृष्टी कशी वाढवायची, त्याची चर्चा या बैठकीत होणार आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त मंत्र्यांच्या विकासाचे काम केले. दोन डझन नेते भ्रष्टाचारात अडकले. काही जेलमध्ये तर काही बेलवर.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.