दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट

151

पुण्यात एका कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीला आग लागली. सुदैवाने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने कोणतीही इजा झाली नाही.

( हेही वाचा : देशातील आठवी आणि तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस! पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा )

हिंजवडीमध्ये कराटे क्लासचे उद्घाटन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी दीपप्रज्वलन करून, पुष्पाहार अर्पण करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला आग लागली. उपस्थितांच्या लक्षात आल्यावर साडीला लागलेली आग लगेच विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाल्या परंतु त्यांनी इतरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.