NCP : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप 

पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे.

163
पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप 
पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्या NCP  बड्या नेत्यांच्या अमित शाह यांच्यासोबत तीन बैठका झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

काही नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रात आपण सर्वांनी पाहिल्या आहेत. त्या बातम्यांचे कुणी खंडन केले नाही. मी आणखी खोलात जाऊन पत्रकारांना विचारले, तेव्हा अमित शाहंसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तीन-तीन बैठका झाल्या आहेत, असे कळले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. शिंदे सरकारवर सर्वोच्च न्यायालयातून आघात झाला, निलंबनाच्या खटल्यात शिंदेंविरोधात निकाल गेला आणि 16 आमदार निलंबित झाले, तर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लागेल. तो मुख्यमंत्री बाहेरून घ्यायचा का? राष्ट्रवादी काँग्रेसमधूीन NCP घ्यायचा का? अशा अटकली चालल्या आहेत. या सगळ्या जगजाहीर अटकली आहेत’, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

(हेही वाचा BJP : भाजपनेही भाकरी फिरवली; नव्या कार्यकारिणीत कोणाला मिळाली संधी?)

पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे. पृथ्वीराज चव्हाणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पत्रकारांनी सांगितले असे ते ऐकिव माहितीच्या आधारावर बोलत आहेत. राष्ट्रवादीची NCP भाजपसोबत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत आहे, युपीएसोबत आहे. मोदी सरकारच्या विरोधात आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.