Navneet Rana:नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक

नवनीत राणा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, शुक्रवारी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली.

156
Navneet Rana: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध ठरवले

अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी (Amravati Lok Sabha Constituency) भाजपाने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली, मात्र भाजपातील स्थानिक नेत्यांनी आणि आता आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अमरावतीत ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे नवनीत राणांचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. (Union Home Minister Amit Shah, Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

नवनीत राणा यांनी अमरावतीत होत असेलल्या विरोधावर भाष्य करताना सर्वांनी देशाच्या विकासासाठी मतभेद विसरून मला पाठिंबा द्यावा, असे म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर शुक्रवारी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी मी वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं राणा यांनी म्हटले.

आयुष्यात नवीन इनिंगची सुरुवात केली असून मी पक्षातील वडीलधाऱ्यांचा, आमच्या नेत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आले आहे. अब की बार, ४०० पार हे मोदींचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी अमरावतीकरांचीही साथ असेल. ४०० जागांमध्ये अमरावतीचीही एक जागा असेल, हा विश्वास देण्यासाठी मी इथे आले होते, असे नवनीत राणा यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर म्हटले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : “काय करावे” व “काय करु नये” याबाबत काय म्हणते आदर्श आचारसंहिता)

शाह यांच्या भेटीनंतर व्यक्त केला विश्वास…
देशात मोदींची मोठी लाट असतानाही अमरावतीकरांनी माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला साथ दिली होती. २०१९ मध्ये माझं लोकसभा क्षेत्रात शून्य काम असतानाही मला निवडून दिलं होतं. येथील नागरिकांचा आवाज बनून गेल्या ५ वर्षांत मी काम केलं आहे. आता, जे काही वरिष्ठ नेते माझ्याविरुद्ध उमेदवार देण्याचं बोलत आहेत. त्यांची समजूत काढायचं काम आमच्या महायुतीतील वरिष्ठ नेते करतील, असा विश्वासही नवनीत राणा यांनी शाह यांच्या भेटीनंतर व्यक्त केला.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.