शुभांगी पाटील बाळासाहेब थोरातांना भेटायला गेल्या; पण आल्या पावली परतल्या

98

सध्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुका होणार आहे. यात नाशिक मतदार संघाची निवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. या ठिकाणी सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र यात शुभांगी पाटील यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण पाठिंबा मिळवण्यासाठी शुभांगी पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शुभांगी पाटील आल्या पावली परत गेल्या.

थोरातांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी ओळखले नाही  

शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांचा पाठिंबा मिळवला. त्यानंतर शुभांगी पाटील संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र थोरात कुटुंबीय सध्या मुंबईत असल्याने त्यांना प्रवेशद्वारातूनच परत जावे लागले. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना घरी कोणीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील आल्या पावली परत गेल्या. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले नसेल आणि थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने पाटील यांना तसे सांगून परत पाठविले, असेल असे थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

(हेही वाचा ट्विटरचे ब्ल्यू-टिक पाहिजे, तर 11 डॉलर्स मोजा)

बाळासाहेब थोरात मुंबईत 

या मतदारसंघात काँग्रेसचे सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत यांनी पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पुरस्कृत केले असून त्याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. या सर्व प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मोठी कोंडी झाली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला गेले असता ते घसरून पडल्याने त्यांचा खांदा दुखवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज संगमनेरमध्ये त्यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील यांना प्रवेश नाकारण्याचा किस्सा घडला. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.