Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात समावेश झालेल्या नवनिर्वाचित खासदारांचे देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन; म्हणाले…

183
Monsoon Session : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए (NDA) सरकारचा रविवारी शपथविधी होत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी ९ जून रोजी, दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात (Delhi Rashtrapati Bhawan)  संध्याकाळी ०७:१५ मिनिटांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ (PM Oath) घेणार आहेत. यावेळी मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे.  दरम्यान, एनडीए सरकारमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार? याची चर्चा रंगली असतानाच महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं आहे. ज्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे. अशा खासदारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी अभिनंदन केले. (Narendra Modi Oath Ceremony)

(हेही वाचा – सरपंच ते केंद्रीय मंत्री… असा आहे Raksha Khadse यांचा राजकीय प्रवास)

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी राष्ट्रपती भवन आणि दिल्लीत कडेकोट बंदोबस्तासह तयारी सुरू आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी शुक्रवारी संपन्न होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरत आहेत. (Narendra Modi Oath Ceremony)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.