Chhattisgarh Naxalism: चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ८ लाखांचे बक्षीस असलेला कमांडरही ठार

नारायणपूर, दंतेवाडा आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले.

126
Chhattisgarh Naxalism: चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ८ लाखांचे बक्षीस असलेला कमांडरही ठार

नक्षलवादी चकमकीच्या घटना वारंवार घडत आहे. अशीच एक घटना  छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त (Chhattisgarh Naxalism) नारायणपूर (Narayan District) जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर, दंतेवाडा आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. तर ८ लाखांचे बक्षीस असलेला कमांडरला (Naxalite commanders) ही ठार मारण्यात यश आले आहे.  (Chhattisgarh Naxalism)

(हेही वाचा – Narendra Modi: शपथविधीपूर्वी मोदींनी घेतली संभाव्य मंत्रिमंडळाची बैठक, 100 दिवसांच्या रोडमॅपवर चर्चा, कोणत्या प्रलंबित योजना पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना?)

या चकमकीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री नक्षलविरोधी अभियानात सुरक्षा दलांना छत्तीसगडच्या नारायणपूर, दंतेवाडा आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या मुंगेडी आणि गोबेल भागात पाठवण्यात आले. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी सुरक्षा दल गोबेल भागात असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवसभर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

(हेही वाचा – Temple In Pakistan : हिंदूंंना आता पाकिस्तानातील मंदिरांतही जाता येणार ?; काय म्हणाले सिंधचे पर्यटनमंत्री…)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी होण्याची शक्यता आहे. या चकमकीत नारायणपूर डीआरजीचे तीन जवानही जखमी झाल्याचे त्यांन सांगितले. जखमी जवानांची प्रकृती सामान्य असून धोक्याबाहेर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संयुक्त मोहिमेत नारायणपूर, कोंडागाव, दंतेवाडा, जगदलपूरचे डीआरजी आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या ४५ व्या कॉर्म्सचा समावेश आहे. परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Chhattisgarh Naxalism)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.