सरपंच ते केंद्रीय मंत्री… असा आहे Raksha Khadse यांचा राजकीय प्रवास

Raksha Khadse या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.

158
सरपंच ते केंद्रीय मंत्री... असा आहे Raksha Khadse यांचा राजकीय प्रवास
सरपंच ते केंद्रीय मंत्री... असा आहे Raksha Khadse यांचा राजकीय प्रवास

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. (loksabha election 2024) या वेळी 40 ते 45 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना केंद्रीय मंत्रीपदासाठी बोलावण्यात आले आहे.

(हेही वाचा – NDA सरकारमध्ये NCP ला मंत्रीपद नाही ?, फडणवीस पोहोचले थेट दिल्लीतील तटकरेंच्या घरी)

कशी आहे रक्षा खडसे यांची राजकीय कारकीर्द…

जळगावच्या राजकारणात नेहमीच खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

कोण आहेत रक्षा खडसे?

नाव : श्रीमती रक्षा निखिल खडसे

जन्म तारीख : 13/05/1987

वय : 37 वर्षे

शैक्षणिक पात्रता : बी. एससी (संगणक शास्त्र)

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्लिश

पतीचे नाव : स्वर्गीय. निखिल एकनाथराव खडसे (जिल्हा परिषद सदस्य- 2007 ते 2012)

सासऱ्यांचे नाव : एकनाथ खडसे (माजी मंत्री, महसूल आणि कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य)

पक्ष कार्य : २०१० पासून

राजकीय कारकीर्द

1. सरपंच कोथळी, तालुका – मुक्ताईनगर, जिल्हा – जळगाव, महाराष्ट्र

2. जिल्हा परिषद – जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष (सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव,

3. ⁠2014 ते 2019 पर्यंत पहिल्यांदा खासदार

4. 2019 ते 2024 पर्यंत दुसर्‍यांदा खासदार

5 . 2024 साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.

संसदेतील समितींमध्ये सहभाग

1. माहिती व तंत्रज्ञान

2. महिला सक्षमीकरण

3. ⁠इतर मागासवर्गीय कल्याण (ओ बी सी)

4. ⁠सल्लागार समिती एम/ओ संस्कृती आणि पर्यटन

5. नेशनल इंस्टिट्यूट ऑफ फैशन बोर्ड ऑफ गव्हर्नन्स तंत्रज्ञान (NIFT)

6. आंतरराष्ट्रीय संसदीय मंच जिनिव्हाचे बोर्ड सदस्य, स्वित्झरलँड

7. सल्लागार समिती ⁠ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयावरील सल्लागार समिती. (Raksha Khadse)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.