उद्धव ठाकरे नारायण राणेंना का घाबरत असतील? असं कोणतं गुपित राणेंनी दाबून ठेवलंय?

114

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, तरी ते उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर किंवा फेसबुक लाईव्हनंतर पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंचा समाचार घेत असतात. त्यांचं जे पद आहे, त्या पदाशी संबंधित ह्या गोष्टी नाहीत. हे काम महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांचं आहे. तरी ते उद्धव ठाकरेंना काऊंटर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतात आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपचे वरिष्ठ त्यांना याबाबत जाब विचारत नाहीत.

( हेही वाचा : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात ६ हजार कोटींची गृहविक्री)

ज्यावेळी संजय राऊत रोज सकाळी पत्रकारांसमोर विरोधकांना गलिच्छ शिव्या द्यायचे त्यावेळी अनेक शिवसेना-प्रेमी (शिवसेनेचे कार्यकर्ते नव्हे) संजय राऊतांना दूषणे द्यायचे आणि म्हणायचे राऊत एक दिवस शिवसेनेला आणि ठाकरेंना बुडवणार. यावर माझं म्हणणं असं असायचं की संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी काम करतात. एकतर ठाकरेंनी सांगितलेलं ते बोलतात किंवा ठाकरेंच्या मनातलं ते बोलतात आणि ठाकरेंची त्यास संमती आहे.

हाच न्याय नारायण राणे यांच्यासाठी लावला तर… म्हणजे राणे जे बोलतात, त्यास ज्येष्ठ नेत्यांची मूक संमती तर नाही ना? शिवसेना सोडल्यानंतर राणे कॉंग्रेसमध्ये गेले, परंतु तिथे त्यांचा सन्मान झाला नाही म्हणून त्यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षाची स्थापना केली होती. परंतु पुढे ते भाजपमध्ये आले आणि भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं. इतकंच काय तर भाजपमध्ये आल्यानंतर नितेश राणे हे तरुण पिढीतले आघाडीचे नेते झाले. भाजपने उद्धव ठाकरेंचं मन सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ठाकरे सतत भाजपवर खालच्या भाषेत टिका करत राहिले. अखेर २०१९ मध्ये ते हिंदुविरोधी पुरोगाम्यांच्या गटात शिरले.

राणे-ठाकरे वैर महाराष्ट्राला काही नवीन नाही. राणे महाराष्ट्रातले जुने जाणते नेते आहेत. त्यांनी स्वतः शिवसेना वाढवली आहे. शिवसेनेतल्या अनेक गोष्टी त्यांना माहित आहेत. राणे आणि राणे पुत्र रोज नवे गौप्यस्फोट करत असतात. त्यात आता शिंदे आले आहेत. राणे यांच्याकडे जे खातं आहे, त्यामुळे कोण कोण खातं हे त्यांना कळतं. राणेंनी हल्लीच पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या अब्रूचे धिंडवडे काढले. तरी ठाकरे सहसा राणेंच्या वाटेला जात नाही.

राणे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. त्यांच्यामुळेच त्यांनी शिवसेना सोडली आणि आता राणेंच्या घरावर झालेली कारवाई ही ठाकरेंमुळेच. त्यामुळे राणेंनी या पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं आहे की ते या गोष्टीचा सूड घेणार आहेत. अर्थात हा सूड राजकीय व लोकशाही पद्धतीचा असणार आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय प्रवासात विरोधक नव्हे तर शत्रू निर्माण केले आहेत. मग राज ठाकरेंसारखे प्रतिस्पर्धी असतील किंवा जयदेव व स्मिता ठाकरेंसारखे गैर-राजकीय शत्रू असतील, असे अनेक शत्रू त्यांनी निर्माण केले आहेत आणि ठाकरेंच्या पडत्या काळात त्यांचे जुने मित्र, जे आता शत्रू झाले आहेत ते वाचवायला येणार नाहीत आणि त्यांना जे मित्र वाटतात, ते पुरोगामी पक्ष पराकोटीचे स्वार्थी आहेत.

नारायण राणे यांच्याकडे अनेक गुपिते आहेत, इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत. पत्रकार परिषदेत मातोश्रीचा त्यांनी उल्लेख केला, त्यावरील कारवाई लवकरच पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वात मोठी चूक केली, ती म्हणजे त्यांनी प्रत्येक विरोधकांचा इगो दुखावला. आता त्यांना जी पळापळ करावी लागतेय, हा त्याचाच परिणाम आहे. उद्धव ठाकरे यांच्या अवस्थेला सर्वात जास्त जबाबदार कोण असतील तर ते नारायण राणे आहेत. आता तर ते जास्तच दुखावले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात ते काळ बनून समोर उभे राहतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.