कोरोनात नायगाव पोलिस वसाहतीचे स्थलांतर चुकीचे! देवेंद्र फडणवीसांची भूमिका 

या वसाहतींची पाहणी केल्यावर त्या राहण्यालायक नाहीत असे दिसत नाही त्याची गरजेप्रमाणे दुरुस्ती करणे शक्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

114

राज्य सरकारने नायगाव न्यू पोलिस वसाहत धोकादायक झाली असून ती तात्काळ रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. त्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. कोरोनाच्या काळात पोलिस वसाहतीचे स्थलांतर करणे चुकीचे आहे, अशी भूमिका घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध केला आहे.

नायगाव वसाहत राहण्यायोग्य!

मुंबई महापालिकेने या वसाहतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून या वसाहतीतील इमारकती धोकादायक बनल्या आहेत, त्यामुळे त्या तात्काळ रिकाम्या करण्यात याव्यात, अशी नोटीस दिली आहे. त्याला येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. रहिवाशांच्या विनंतीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वसाहतीला भेट दिली. त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर हे उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वसाहतीची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले कि, या वसाहतींची पाहणी केल्यावर त्या राहण्यालायक नाहीत असे दिसत नाही त्याची गरजेप्रमाणे दुरुस्ती करणे शक्य आहे. त्यासाठी स्थानिक आमदार निधीतून हे काम करण्याची तयारी आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मागणीनुसार या वसाहतीतील कुटुंबांचे कोरोना काळात स्थलांतर करण्यात येऊ नये. तसेच ज्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो भागही सुरक्षित नाही, म्हणून यासंबंधी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान नायगाव पोलिस हेड्क्वाटर येथे संपूर्ण पोलिस वसाहत उभारण्याचा प्रस्ताव आमच्या काळात तयार करण्यात आला होता, मात्र सरकार बदलल्याने तो रखडला आहे. त्यामुळे या सरकारने या प्रस्तावाचा विचार करावा, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला ना हरकत, पण…! काय म्हणाले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.