पवारांच्या बंगल्यावर नेमके धडकले कोण? आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांना थांगपत्ता नाहीच

94

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी संपावर दिलेल्या निर्णयानंतरही संपकरी एसटी कर्मचारी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर धडकले. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू असून अद्याप आझाद मैदानावर राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलनीकरण व्हावे, या एका प्रमुख मागणीसाठी ठाण मांडून आहे. अशापरिस्थितीत आझाद मैदानावरील एका संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाबाबत काहीच थांगपत्ता नसल्याचे सांगितले.

“जे आंदोलक गेले ते कोण, कसे गेले आम्हाला समजलेले नाही”

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील बंदोबस्त वाढविला असून बाहेरून कोणालाही आतमध्ये येऊ दिले जात नाही. परंतू बाहेर गावी ज्या कर्मचाऱ्यांना जायचे आहे, त्यांना मैदानात जाऊ दिले जात आहे. यापैकी एका आंदोलक कर्मचाऱ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, शरद पवारांच्या घरावर जे आंदोलक गेले ते कोण, कसे गेले ते आम्हाला समजलेले नाही. या आंदोलनाबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हती. वकील सदावर्ते आम्हाला जे काही सांगतील, त्यावर पुढील दिशा ठरेल, आमचे आंदोलन संपलेले नाही, असेही त्या कर्मचाऱ्याने सांगितले.

(हेही वाचा – एसटी संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.