#ModiKaParivar काय आहे हा ट्रेंड?

भाजपाच्या प्रत्येक नेत्याने आता आपल्या ट्विटर हँडल वरील नावाच्या प्रोफाइल समोर #ModiKaParivar असा बदल करीत विरोधकांना जोरदार उत्तर दिले आहे.

249
#ModiKaParivar काय आहे हा ट्रेंड?

सोशल मीडियावर मोदी का परिवार (#ModiKaParivar) नावाने एक ट्रेंड पुन्हा एकदा सुरू झाला आहे. काल रविवारी बिहारमधील सभेमधून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मोदींना परिवार नसल्याचे तसेच ते हिंदू नाहीत बोलून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले. याच गोष्टीचा फायदा उचलत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेलंगणामधील सभेत संबोधित करीत असताना देश माझा परिवार असल्याचे बोलून आपल्यावर होत असलेल्या आरोपांना प्रति वार करत #ModiKaParivar हा ट्रेंड सुरू केला आहे. (#ModiKaParivar)

(हेही वाचा – Mahadev Jankar महायुतीतून बाहेर? पुण्याच्या महायुती बैठकीचं महादेव जानकरांना निमंत्रण नाही)

भाजपाच्या (BJP) प्रत्येक नेत्याने आता आपल्या ट्विटर हँडल वरील नावाच्या प्रोफाइल समोर #ModiKaParivar असा बदल करीत विरोधकांना जोरदार उत्तर दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारे राहुल गांधी द्वारा चौकीदार चोर आहे ला उत्तर देत असताना #मैं_भी_चौकीदार_हूँ असा ट्रेंड चालवून मोदींनी विरोधकांना जोरदार उत्तर दिले होते आणि त्याचेच फलस्वरूप म्हणून मोदींना लोकसभेत घवघवीत यश मिळाले होते. स्वतःवर होणाऱ्या खालच्या दर्जातील आरोपांचा देखील फायदा कसा उचलावा याचा चांगलाच अनुभव मोदी आणि त्यांच्या भाजपाला आजच्या घटनेतून दिसून येत आहे. (#ModiKaParivar)

१४० कोटी जनता माझे कुटुंब : मोदी 
देशातील १४० कोटी जनता माझे कुटुंब आहे. माझा देशच माझे कुटुंब असल्याचे मोदी म्हणाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी एक्स हँडलवरील आपल्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले आहेत. (#ModiKaParivar)
काय म्हणाले मोदी?
भ्रष्टाचार, घराणेशाही, ध्रुवीकरणमध्ये बुडालेल्या विरोधी पक्षातील नेते काहीही बरळत आहेत. त्यांनी २०२४ चे घोषणापत्र काढले आहे. मी त्यांच्या घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मोदींचे कुटुंब नाही, असे बोलायला लागले. देशवासिय मला चांगल्याप्रकारे ओळखतात, समझतात. माझ्या प्रत्येक क्षणाची खबर देशाला आहे. १४० कोटी देशवासीय माझे कुटुंब आहे. देशातील तरूण, महिला, गरीब, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले हे सर्व माझे कुटुंब आहे. माझा भारतच, माझे कुटुंब आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. (#ModiKaParivar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.