Modi@9 : भाजपाकडून ‘मोदी @9’ जनसंपर्क अभियान; देवेंद्र फडणवीसांचे ११ शिलेदार मैदानात

येत्या १५ जूनपर्यंत हे अभियान (Modi@9) राज्यभर सुरू राहणार आहे. यानिमित्ताने मोदी सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

114
Modi@9 : भाजपाकडून 'मोदी @9' जनसंपर्क अभियान; देवेंद्र फडणवीसांचे ११ शिलेदार मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकरला केंद्रात सत्तेवर येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून ‘मोदी @9’ (Modi@9) जनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले असून, संपूर्ण देशभर ते राबविले जाणार आहे. महाराष्ट्रात हे अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपले ११ शिलेदार मैदानात उतरवले आहेत.

(हेही वाचा – ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचा दाखला देत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणून पवारांचे मानले आभार)

येत्या १५ जूनपर्यंत हे अभियान (Modi@9) राज्यभर सुरू राहणार आहे. यानिमित्ताने मोदी सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्हा-तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या मदतीने हे अभियान राबवले जाणार आहे.

हेही पहा – 

https://www.youtube.com/watch?v=s5UZFYj_xdA

‘मोदी@9’ हे अभियान (Modi@9) यशस्वी करण्यासाठी प्रदेश भाजपाने विशेष समिती नियुक्त केली आहे. त्यात प्रवीण दरेकर – संयोजक, डॉ. संजय कुटे – सहसंयोजक, श्रीकांत भारतीय, जयकुमार रावल, खा. डॉ. अनिल बोंडे, खा. धनंजय महाडिक, निरंजन डावखरे, राणा जगजितसिंह पाटील, चित्रा वाघ, राहुल लोणीकर, श्वेता शालिनी यांचा समावेश आहे. (Modi@9)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.