Drainage Inspection Tour : मुख्यमंत्र्यांचा नालेसफाई पाहणी दौरा; शहराचे पालकमंत्रीच गायब

महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सार्वजनिक ठिकाणी भूमिगत साठवण टाक्या उभारण्यासाठी काही जागा निवडून प्रकल्प राबविण्याची तयार दर्शवली असता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा ठिकाणांची निवड करून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

36
Drainage Inspection Tour : मुख्यमंत्र्यांचा नालेसफाई पाहणी दौरा; शहराचे पालकमंत्रीच गायब
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील नाल्यातून (Drainage Inspection Tour) गाळ काढण्याच्या कामांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ मे, गुरुवारी आढावा घेतला. वांद्रे (पूर्व) येथे मिठी नदी परिसर, वांद्रे-कुर्ला संकुलात भारत नगर येथे वाकोला नदी, दादरमधील प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत साठवण टाकी, वरळीतील लवग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्र या सर्व ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. परंतु या मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष नालेसफाईच्या पाहणी दरम्यान खुद्द मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हेच अनुपस्थित होते. त्यामुळे शहराच्या पालकमंत्र्यांना मुंबईची काहीच चिंता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

(हेही वाचामुख्यमंत्री भर उन्हात फिल्डवर, पालिका अधिकाऱ्यांना फुटला घाम)

या नालेसफाईच्या दौऱ्यात  (Drainage Inspection Tour) मुख्यमंत्र्यांसमवेत राज्याचे पर्यटन, महिला आणि बाल कल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार  सदा सरवणकर,  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त  आयुक्त (शहर)  आशीष शर्मा, अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३)  रणजित ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या)  विभास आचरेकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मोठ्या नाल्यांची खोली आणखी १ मीटरने वाढवा!
मुंबईतील लहान मोठे मिळून सुमारे २२०० किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या नाल्यांमधून (Drainage Inspection Tour) पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या नाल्यांचे ४ मीटरपर्यंत खोलीकरण करण्यात येते. ते खोलीकरण ४ मीटरऐवजी ५ मीटरपर्यंत करावे. त्यासोबतच नाल्यांना गॅब्रियल पद्धतीच्या सीमाभिंती बांधाव्यात. भरतीच्या वेळी ज्या भागात समुद्राचे पाणी शिरते, अशा ठिकाणी फ्लड गेट्सची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सार्वजनिक ठिकाणी भूमिगत साठवण टाक्या उभारण्यासाठी काही जागा निवडून प्रकल्प राबविण्याची तयार दर्शवली असता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा ठिकाणांची निवड करून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. लव्हग्रोव्ह नाल्यातून (Drainage Inspection Tour) गाळ उपसण्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करा. भरतीच्या काळात याठिकाणी पाणी उपसा करणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठीचा प्रकल्प अधिक क्षमतेने कार्यान्वित ठेवावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. लव्हग्रोव्ह पर्जन्यजल उदंचन केंद्राच्या ठिकाणी गाळ उपसा करणारा पंप हा मिठी नदीतही लावता येईल किंवा कसे, याची चाचपणी महानगरपालिकेने करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी दिले.
भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड आशिष शेलार यांनी आपल्या खासदार, आमदार आणि माजी नगरसेवक यांना सोबत घेऊन नालेसफाईच्या कामाची पाहणी (Drainage Inspection Tour) करत या सफाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नालेसफाई कामाचे आकडे हे रतन खात्रीच्या आकड्यांसारखे असल्याचा आरोप करत त्यांनी नालेसफाईच्या कामाची कंत्राटदारांनी दिलेल्या आकडेवारीची फेरतपासणी करा अशी मागणी केली. तसेच नाल्यातून किती खोल गाळ काढला याची आकडेवारी जाहीर करा अशीही मागणी केली. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी केलेल्या पाहणीनंतर राज्याच्या मुख्य मंत्र्यांना रस्त्यावर उतरावे लागले असून उपनगराचे पालकमंत्री हे आपल्या नेत्यासह नालेसफाईच्या कामाची माहिती घेत असले तरी शहराचे पालकमंत्री हे  मुंबईतील नालेसफाईच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने मुख्यमंत्र्यांना स्वतः नालेसफाईच्या कामाची माहिती घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आणि या पाहणी दौऱ्याकडे पालकमंत्र्यांनी  पाठ फिरवल्याने केसरकर हे मुंबईच्या समस्या आणि प्रश्न याबाबत गंभीर नसून मंत्री पदाचा फायदा घेऊन शिवसेना पक्षाला अधिक मजबूत करणे किंवा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे किती चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे सिद्ध करण्याची संधी केसरकर हे हातची घालवत असल्याचे स्पष्ट होते. एका बाजूला उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे मंत्री पदाचा पुरेपूर वापर करत जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडवताना पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे शिवसेनेला स्थानिक पातळीवर मजबूत करताना दिसत नाही. त्यामुळे नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यातून (Drainage Inspection Tour) केसरकर यांनी पुन्हा हे दाखवून दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाला मुंबईत अधिक मजबूत करण्यासाठी भाकरी परतवून शहराच्या पालकमंत्री पदाची धुरा अन्य मंत्र्यांवर  सोपवावी लागेल असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.