Elon Musk : एलॉन मस्क यांनी केली नवीन घोषणा; ‘या’ युजर्सना होणार फायदा

ट्विटरनं घोषणा केली होती की, कंपनी सशुल्क ब्लू टिक सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला हे यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.

28
Elon Musk : एलॉन मस्क यांनी केली नवीन घोषणा; 'या' युजर्सना होणार फायदा

मागच्या वर्षी एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतले. तेव्हपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्विटर हे नेहमी चर्चेत राहिले आहे. २०२२ मध्ये मस्क यांनी घोषीत केले होते की ते ट्विटरला नवीन रूप देणार आहेत.येत्या काही वर्षांमध्ये ट्विटरला ‘ट्विटर २.० द ऐवरीथींग अॅप’ असं स्वरूप देण्याचं मस्क यांचं स्वप्न आहे. जगभरातील ४५० दशलक्ष युजर्ससाठी मस्क सातत्याने नवनवीन फिचर्स घेऊन येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एलॉन मस्क यांनी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे.

(हेही वाचा – Elon Musk : एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होणार; सीईओ पदाची सूत्रे ‘या’ व्यक्तीच्या हाती येणार)

२ तासांचा व्हिडीओ

आतापर्यंत ट्विटरवर (Elon Musk) व्हिडीओ शेअर करताना युजर्सना वेळेचे तसेच व्हिडीओ साईजचे बंधन असायचे. मात्र नवीन फीचर्समुळे आता युजर्सना चक्क २ तासांचा आणि ८ जीबी इतका व्हिडीओ शेअर करता येणार आहे. मात्र हे फीचर्स केवळ ब्ल्यू टिक धारकांनाच वापरता येणार आहे.

ट्विटर ब्लू म्हणजे काय?

ट्विटरनं घोषणा केली होती की, कंपनी सशुल्क ब्लू टिक सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला हे यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर भारतातही याची सुरुवात झाली. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या खात्यावर ब्लू टिक मिळू शकते. डेक्सटॉपसाठी भारतात या ब्ल्यू टिकच्या (Elon Musk) सबक्रिप्शनची सुरूवात ६५० रुपये तर मोबाईलवरून ट्विटर वापरण्यासाठी प्रत्येक महिन्याला ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

नेटकऱ्यांनी या नव्या फीचर्सची ‘नेटफिल्क्स’ आणि युट्युब सोबत तुलना केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.