MNS : अन्यथा ‘खळ्ळखट्याक होईल’; मनसेचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुकानावरील पाट्या मराठीत करा अन्यथा 'खळ्ळखट्याक होईल', असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

108
MNS : अन्यथा 'खळ्ळखट्याक होईल'; मनसेचा इशारा
MNS : अन्यथा 'खळ्ळखट्याक होईल'; मनसेचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुकानावरील पाट्या मराठीत करा अन्यथा ‘खळ्ळखट्याक होईल’, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. (MNS)

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट केली आहे. आधी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या ह्या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता ५ दिवस उरले आहेत, असे शिदोरे यांनी म्हटले आहे. (MNS)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : ‘त्या’ फोटोवर अखेर चंद्रशेखर बावनकुळे बोललेच; म्हणाले…)

मुंबईसह राज्यात बहुतांश दुकानांची नावे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बऱ्याच काळापासून या विरोधात भूमिका घेतली आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसेतर्फे आंदोलनही करण्यात आले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी २५ नोव्हेंबर पर्यंतची मुदतही देण्यात आली होती. याचीच आता मनसेने पुन्हा आठवण करून दिली आहे. तसेच २५ नोव्हेंबर पर्यंत दुकानांची नाव मराठीत झाली नाही तर.. खळ्ळखट्याकचा इशाराही मनसेतर्फे दिला आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.