Chandrashekhar Bawankule : ‘त्या’ फोटोवर अखेर चंद्रशेखर बावनकुळे बोललेच; म्हणाले…

57

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पर्यटनावर असताना त्यांचा कॅसिनोतील एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हायरल केला. महाराष्ट्र जळत असताना राज्यातील नेता मकाऊमध्ये असल्याची पोस्ट त्यांनी केली होती. त्या फोटोवरून संजय राऊतांनी भाजपला सतत टीका सुरु केली. मात्र हे आरोप होत असताना माध्यमांपासून अचानक दूर गेलेले बावनकुळे बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी अखेर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी यावर खुलासा केला.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, मागच्या ३४ वर्षांपासून मी राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत. चारवेळा आम्ही निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असे मला वाटते. ३४ वर्षे काम करून आम्ही इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ. पण यामुळे माझ्या परिवाराला त्रास झाला. माझ्या मुलीने आणि सुनेने माझ्याकडून तीन दिवसांचा वेळ घेऊन नियोजन केले होते. हाँकाँग या पर्यटनस्थळी गेलो. सगळे चांगल चालू असताना व्यक्तिगत जीवनात आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात काम करताना असे प्रयत्न चुकीचे वाटतात. त्यामुळे मला आणि परिवाराला वाईट वाटले. सगळ्यांनाच माहितेय की कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करावे लागते. मकाऊ किंवा हाँककाँगला गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करूनच सगळीकडे जावे लागते.  कोणीतरी असे प्रयत्न करायचे आणि ३५० कोटींचा आरोप केला. एक रुपयाही तुमच्या बॅगेत असला तर तीन तीन वेळा चेकिंग करावी लागते, असेही Chandrashekhar Bawankule यांनी पुढे सांगितले.

(हेही वाचा Manipur Violence : …तोपर्यंत मणिपूर हिंसाचार सुरूच रहाणार; लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांची स्पष्टोक्ती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.