महंमद पैगंबर यांच्याविषयी वक्तव्य केल्यामुळे हैद्राबाद येथील घोशमहल मतदारसंघाचे आमदार टी. राजा सिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरील पीडी ऍक्ट रद्द करण्यात आला आणि बुधवार, ९ नोव्हेंबर रोजी त्यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावर आमदार टी. राजा सिंह यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘धर्माचा विजय झाला, पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी उपस्थित झालो आहे.’
धर्म की विजय हुई।
एक बार पुनः आपकी सेवा में उपस्थित होगया हु।
जय श्री राम 🚩 pic.twitter.com/UM2LcpxuMu
— Raja Singh (@TigerRajaSingh) November 9, 2022
जाचक अटींसह जामीन
हैदराबादमधील घोशमहल येथील भाजप आमदार टी. राजा सिंह यांना मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आता त्यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांना काही अटीही लावण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यास आणि कोणत्याही धर्माचा अपमान करु नये अशाही सूचना दिल्या आहेत. तसेच कोणतीही पत्रकार परिषद, रॅली किंवा मिरवणुकीतही भाग घेता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा अंदमानातील सावरकर कोठडीतील इतिहास खरवडून काढला, कोण आहे दोषी?)
सोशल मीडियावर सक्रिय होण्यास प्रतिबंध
टी. राजा सिंह यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर ते तीन महिने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणार नसल्याची अटही त्यामध्ये घालण्यात आली आहे. टी. राजा यांच्याकडून यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, त्यामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर हैदराबादसह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर मात्र पीडीए अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेश मिळाल्यानंतर ते जामिनावर तुरुंगातून सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community