सध्या एटीएममधून आता दोन हजार रूपयांच्या नोटा फारच कमी वेळा येतात हे तुमच्या लक्षात आले आहे का, यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या तीन वर्षात 2000 रूपयांच्या नव्या नोटा छापलेल्या नाहीत. याबाबतची माहिती एका आरटीआयच्या उत्तरात ही बाब समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आयएएनएस या वृत्तसंस्थेने आरटीआय दाखल केला होता. 2019-20, 2021-22 या तीन वर्षांत दोन हजार रूपयांची एकही नवी नोट छापण्यात आली नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
(हेही वाचा – ब्लू टिकच नाही तर ट्विटर युजर्सनाही मोजावे लागणार पैसे! काय आहे मस्कचा नवा प्लॅन?)
आयएएनएसने दाखल केलेल्या आरटीआय अर्जातून असे समोर आले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नोट मुद्रा (पी) लिमिटेडने 2016-17 या आर्थिक वर्षात 2,000 रुपयांच्या 35,429.91 कोटी नोटा छापल्या, 2017-18 आणि 2017-18 मध्ये 1,115.07 कोटी नोट छापल्या, 2018-19 मध्ये आणखी कमी करून केवळ 4,66.90 कोटी नोटा छापल्या गेल्या. दुसरीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोट मुद्रा (पी) लिमिटेडकडून मिळालेल्या आरटीआयच्या उत्तरात असे दिसून आले आहे की 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये 2,000 रुपयांच्या चलनी नोटा गायब होताना दिसत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 500, 1000 रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणली होती. यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी रिझर्व्ह बँकेने 2 हजार रूपयांची नोट बाजारात आणली होती. केंद्र सरकारने 1 ऑगस्ट रोजी संसदेत दिलेल्या उत्तरात म्हटले की, एनसीआरबी च्या डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2 हजार रूपयांच्या बनावट नोटांती संख्या 2, 272 वरून 2, 44,834 झाली आहे. आकडेवारीनुसार, 2016 मध्ये देशात जप्त करण्यात आलेल्या 2 हजार रूपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती, जी 2017 मध्ये 74,898 पर्यंत वाढली, 2018 मध्ये नोटांची संख्या कमी होऊन 54,776 झाली. 2019 मध्ये हा आकडा 90,566 आणि 2020 मध्ये 2,44,834 बनावट नोटा होत्या.
Join Our WhatsApp Community