‘…तर घरात घुसून मारायची हिंमत माझ्यात आहे’, राणांचा कडूंना थेट इशारा

89

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला असताना आता पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिलेल्या इशा-यानंतर आता रवी राणा यांनी कडूंना प्रत्युत्तर दिले आहे. दम देणा-यांना घरात घुसून मारण्याची हिंमत आपल्यात असल्याचा थेट इशारा रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिला आहे.

…तर घरात घुसून मारेन

हा वाद मिटलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मी स्वतः हा वाद मिटवला आहे. पण कोणी जर मला दम देत असेल तर या रवी राणाने उद्धव ठाकरेचाही दम खाल्ला नाही. त्यापुढे बच्चू कडू तर काहीच नाही. प्रेमाची भाषा बोलल्यानंतर रवी राणा एकदा नाही तर दहा वेळा ऐकेल. पण जर कोणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायची हिंमत माझ्यात आहे, असा थेट इशारा रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिला आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

बच्चू कडू यांनी आयोजित एका मेळाव्यात रवी राणा यांना इशारा दिला होता. ही पहिलीच वेळ आहे म्हणून माफ करतोय पण यापुढे जर अशी आगळीक झाली तर पुन्हा माफ करणार नाही, असा स्पष्ट संदेश बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दिला होता. प्रहारच्या वाटेत जर यापुढे कोणी आलं तर प्रहारचा वार कसा आहे हे आम्ही दाखवून देऊ, असा दमही बच्चू कडू यांनी दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.