Sunil Tatkare : भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठीच्या पत्रावर ठाण्यातील आमदाराचीही सही; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

शरद पवारांनीच बैठक घ्यायला लावली

89
Sunil Tatkare : भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठीच्या पत्रावर ठाण्यातील आमदाराचीही सही; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट
Sunil Tatkare : भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठीच्या पत्रावर ठाण्यातील आमदाराचीही सही; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्या भूमिकेवर आता जे टीका करीत आहेत, त्यांनी २०१९ साली भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी पत्रावर सही केली होती. शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या ठाण्यातील आमदाराचाही त्यात समावेश होता. विशेष म्हणजे अलिबागला माझ्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात जी बैठक झाली, ती शरद पवार यांनीच घ्यायला लावली होती, असा गौप्यस्फोट गुरुवारी, दि. ३० नोव्हेंबर रोजी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. (Sunil Tatkare)

कर्जतमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या वैचारिक मंथन शिबिरात ते बोलत होते. २००४ साली राजकीय स्थिती अशी होती की, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सहज विराजमान होऊ शकला असता. परंतु, तसे का होऊ दिले गेले नाही, याचा उलगडा अजित पवार यांनी आता करायला हवा. राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून अजित पवार यांनी फक्त पदे भोगली. त्यांचा पक्षावर अधिकार नाही, असा दावा काहीजण करीत आहेत. पण, हे नवख्या कार्यकर्त्याला तरी पटेल का? (Sunil Tatkare)

अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला, राज्यभरात वाढला. त्यांचे पक्षासाठीचे योगदान कोण विसरू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहतात, याचा अर्थ आपल्या नेतृत्वाने केलेले काम समोर येत आहे, असेही तटकरे म्हणाले. (Sunil Tatkare)

(हेही वाचा – Vasundhara Raje : वसुंधरा राजेंची मुख्यमंत्री पदासाठी रणनिती तयार)

निर्णय आमच्याच बाजूने लागणार

निवडणूक आयोगातील निकाल आमच्या बाजूने लागेल, असे म्हणालो तर काहीजण टीका करतात. त्यांना सांगायचे आहे की, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आमचा निर्णय आहे. लवकरच निवडणूक आयोगाचा निर्णय येईल, त्यावेळी पेपर फुटला, असे म्हटले जाईल. परंतु, हा निर्णय अदृश्य शक्तीचा नाही, तर कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असेल, असेही सुनील तटकरे म्हणाले. (Sunil Tatkare)

स्वतःचा पक्ष का काढला नाही?

अजित पवार यांच्यात इतकीच हिम्मत असती, तर त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला असता. पण तसे न करता ते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क दाखवत आहेत. पंतप्रधानांनी भोपाळ मधील सभेत जाहीरपणे केलेला ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप खरा होता की खोटा? त्याबाबत अधिकृत खुलासा कधी होईल? (Sunil Tatkare)
– विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ता शरद पवार गट

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.