Vasundhara Raje : वसुंधरा राजेंची मुख्यमंत्री पदासाठी रणनिती तयार

राजस्थानचा निकाल रविवारी म्हणजेच ३ डिसेंबरला लागणार आहे. मात्र मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी वेगवेगळ्या रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे.

122
Vasundhara Raje : वसुंधरा राजेंची मुख्यमंत्री पदासाठी रणनिती तयार
Vasundhara Raje : वसुंधरा राजेंची मुख्यमंत्री पदासाठी रणनिती तयार

राजस्थानचा निकाल रविवारी म्हणजेच ३ डिसेंबरला लागणार आहे. मात्र मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी वेगवेगळ्या रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. यात सर्वात आघाडीवर आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje). मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावे यासाठी त्यांचा प्लॅन बी तयार असल्याची चर्चा राजधानीतील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. यामुळे निकालाची उत्कंठा तर आहेच पण राजकीय घडामोडी पण तेज गतीने राजस्थान मध्ये सुरु असल्याचे दिसून येत आहे. (Vasundhara Raje)

मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वसुंधरा राजेंची (Vasundhara Raje) चर्चा सुरू झाली आहे. सत्तेसाठी दोन्ही पक्षांनी निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली. पण, काही कारणास्तव दोन्ही पक्ष सत्तेपासून काही पावले दूर राहिले, तर भाजपला सत्तेत आणण्यात वसुंधरा राजे यांनी बी “प्लॅन ” तयार असल्याचे समजते. (Vasundhara Raje)

राजस्थान विधानसभा (Rajasthan Legislative Assembly) २०१८ च्या निवडणुकीत अपक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी काँग्रेसकडे सरकार स्थापन करण्यासाठी काही आमदारांची कमतरता होती. अशा स्थितीत अशोक गेहलोत यांना अपक्षांना आपल्या बाजूने वळवून घेण्यात यश मिळाले होते. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. यावेळीही दोन्ही प्रमुख पक्षांच्या बंडखोर उमेदवारांची संख्या वाढली आहे. भाजपमधील ३२ बंडखोर आणि काँग्रेसच्या २२ बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. यातील अनेक बंडखोर उमेदवार आपापल्या भागातील त्यांची उंची लक्षात घेऊन विजयी होतील अशी अपेक्षा आहे. (Vasundhara Raje)

यावेळी राजस्थान विधानसभा (Rajasthan Legislative Assembly) निवडणुकीत अपक्षांची संख्या गेल्या वेळेपेक्षा जास्त असू शकते, असे मानले जात आहे. अशा स्थितीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विजयी होण्याची शक्यता असलेल्या अपक्षांशी आतापासूनच अंतर्गत संपर्क सुरू केला आहे. भाजपच्या ३२ बंडखोरांपैकी बहुतांश वसुंधरा राजे यांचे कट्टर समर्थक आहेत. भाजपने यावेळी वसुंधरा समर्थक कैलाश मेघवाल यांना तिकीट दिले नाही. अशा परिस्थितीत अनेकवेळा मंत्री आणि खासदार राहिलेले कैलाश मेघवाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शाहपुरा निवडणूक लढवली. त्याचप्रमाणे भवानी सिंग राजावत हे लाडपुरा मतदारसंघातून, युनूस खान दिडवानामधून, चंद्रपाल सिंग हे चित्तोडगडमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत भाजपच्या वसुंधरा राजे यांचे लक्ष या अपक्षांवर आहे. (Vasundhara Raje)

(हेही वाचा – BSE Market Cap Reaches 4 Trillion : बीएसई स्टॉक एक्सचेंजमधील कंपन्यांचं बाजारमूल्य ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या पार)

वसुंधरा राजे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला, परंतु त्यांचे समर्थक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या जागांवर प्रचाराला गेले नाहीत. यावेळी वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनी अशोक गेहलोत यांचा २०१८ चा ‘खेल’ डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण ‘गेम प्लॅन’ तयार केल्याचे मानले जात आहे. २०१८ मध्ये अशोक गेहलोत कॅम्पच्या सुमारे १७-१८ समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. निकाल आले तेव्हा ना काँग्रेसला सत्ता मिळाली ना भाजपला. (Vasundhara Raje)

परिस्थितीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकलेले गेहलोत समर्थक केवळ अशोक गेहलोत मुख्यमंत्री असतील या एका अटीवर काँग्रेसला पाठिंबा दिला होता. यावेळी असाच काहीसा वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांचा गेम प्लॅन आहे. वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्या समर्थकांनी निवडणुकीत विजय मिळवला आणि भाजप-काँग्रेस सत्तेपासून दूर राहिल्यास हे अपक्ष केवळ एका अटीवर भाजपसोबत एकत्र येऊ शकतात, ती अट म्हणजे वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री करण्याची. अन्यथा हे बंडखोर काँग्रेसशी हात मिळवणी करून शकतात. (Vasundhara Raje)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.