‘मी रवी राणांकडून मरायला तयार आहे’, बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

88

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद काही शांत होताना दिसत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपानंतर या वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात येत असतानाच हा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. दम देणा-यांना घरात घुसून मारू असा थेट इशारा आमदार रवी राणा यांनी कडू यांना दिल्यानंतर बच्चू कडू यांनीही राणांना प्रत्युत्तर दिले आहे.

बच्चू कडूंचा खोचक टोला

रवी राणांचं मी स्वागत करतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फूलं घेऊन तयार आहे. त्यांना माझ्या शरीराचे किती तुकडे करायचे आहेत ते त्यांनी सांगावं. मी त्यांना हात देखील लावणार नाही. मी त्यांच्या हातून मरण्यासाठी तयार आहे. ते कधी माझ्या घरी येणार आहेत ते त्यांनी सांगावं मी त्यादिवशी मी घरात तयार राहतो. त्यांना वाटत असेल की मला चौकात मारावं, तर मी चौकात यायला देखील तयार आहे, अशी खोचक प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या विधानावर दिली आहे.

आम्ही शांततेत घेऊ

माझ्या भाषणात जे काही बोललो ते सार्वत्रिक भाष्य होतं. त्यात मी रवी राणांचा कुठेही उल्लेख केला नव्हता. खोटे आरोप करणा-यांना आपण धडा शिकवणार असल्याचे मी म्हटले होते. ते रवी राणा यांनी इतकं मनावर घेण्याची गरज नव्हती. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून पुन्हा याबाबत बोलेन. इतकी टोकाची भूमिका आम्हाला घ्यायची नाही आम्ही हे प्रकरण शांतपणे हाताळू, असेही आमदार बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः ‘…तर घरात घुसून मारायची हिंमत माझ्यात आहे’, राणांचा कडूंना थेट इशारा)

काय म्हणाले राणा?

हा वाद मिटलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मी स्वतः हा वाद मिटवला आहे. पण कोणी जर मला दम देत असेल तर या रवी राणाने उद्धव ठाकरेचाही दम खाल्ला नाही. त्यापुढे बच्चू कडू तर काहीच नाही. प्रेमाची भाषा बोलल्यानंतर रवी राणा एकदा नाही तर दहा वेळा ऐकेल. पण जर कोणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायची हिंमत माझ्यात आहे, असा थेट इशारा रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.