Milind Deora: शिवाजी पार्कवर ‘या’ पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत, मिलिंद देवरा यांचा ठाकरेंना टोला

या सभेला उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी ठाकरेंना लक्ष्य करत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, रविवारी रात्री शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत.

179
Milind Deora : वर्षा गायकवाड दलित असल्याने त्यांना तिकीट देण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध

भारत जोडो न्याय यात्रेची चर्चा देशभरात चर्चा सुरू आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेनिमित्त देशभरात फिरत आहेत. गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली ही न्याय यात्रा शनिवारी मुंबईत पोहोचली. रविवारी या यात्रेनिमित्त शिवाजी पार्क येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Milind Deora)

या सभेला उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी ठाकरेंना लक्ष्य करत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, रविवारी रात्री शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत. त्या म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील… मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही…, आम्ही समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करतो…, ३७० कायदा रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. एकूणच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार असल्यावरून देवरांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य करत रविवारी शिवाजी पार्कवर ‘या’ पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत असा टोला लगावला आहे. याविषयीची पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

अलीकडेच देवरा यांनी कॉंग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

शनिवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी चैत्यभूमीला भेट दिली. या सभेला माजी मुख्यमंत्री आणि उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या यात्रेची सांगता रविवारी होणार असून इंडिया आघाडीचे दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला खासदार शरद पवार, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.