Aamshya Padavi : आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदे गटात प्रवेश; उबाठा गटाला मोठा धक्का

146
Aamshya Padavi : आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदे गटात प्रवेश; उबाठा गटाला मोठा धक्का
Aamshya Padavi : आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदे गटात प्रवेश; उबाठा गटाला मोठा धक्का

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) जाहीर झाली असताना उबाठा गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. निवडणुकांच्या तोंडावर उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आमदार पाडवी यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह काही नगरसेवकांचा सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झाला आहे. (Aamshya Padavi)

(हेही वाचा – MLA Manisha Kayande: राहुल गांधींची सभा म्हणजे ‘न्याय यात्रे’ची नौंटकी, आमदार मनीषा कायंदे यांची टिका)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आदिवासी नेते म्हणून आमश्या पाडवी यांची ओळख आहे. 2022 मध्ये विधानपरिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. पाडवी आणि सचिन अहिर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली होती. निकाल जाहीर होताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीकडे रवाना झाले होते. त्या वेळी आमदार आमश्या पाडवी यांनी मात्र उद्धव ठाकरेंबरोबर रहाणे पसंत केले होते.

ती शिवसेना कशी ? – एकनाथ शिंदे

ज्यांच्याकडे शिवसैनिक नाही, ती शिवसेना कशी ? ज्यांच्याकडे शिवसैनिकच उरले नाहीत. ती खरी शिवसेना कसे असणार ? बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही आणले. हजारो कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहे. खरी शिवसेना आम्हीच असून आमच्याकडेच धनुष्यबाण आहे. आम्हाला कचरा म्हणाऱ्यांचा एक दिवस कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. गर्दी पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य वाटतो तसेच पुढे ते म्हणाले, आमच्या सभांना मोठी लाखोंची गर्दी होत असते. ती गर्दी पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य वाटतो, असे मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले. (Aamshya Padavi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.