Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का; देवरा शिवसेनेच्या वाटेवर

520
Milind Deora : जे स्वत:च्या इमारतीतील लोकांना न्याय देऊ शकत नाही, ते जनतेच्या समस्या काय सोडवणार! देवरांनी घेतला सावंतांचा समाचार
  • सुजित महामुलकर

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पक्ष नेत्यांकडून देवरांकडे दुर्लक्ष

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघावर उबाठाने दावा केल्यानंतर त्याला देवरा (Milind Deora) यांनी प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात देवरा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र पक्ष नेत्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता दुर्लक्ष केल्यामुळे देवरा (Milind Deora) नाराज झाले, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा Manoj Jarange यांना दिलासा; आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार)

प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

शनिवारी देवरा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून पुढील १-२ दिवसात शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी विचार

देवरा शिवसेनेत आल्यास दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी पक्ष त्यांचा विचार करू शकतो. सध्या हा मतदार संघ भाजपकडे असून शिंदे या जागेसाठी आग्रह धरतील किंवा देवरा (Milind Deora) यांचा राज्यसभेसाठी विचार केला जाऊ शकतो, असे एका देवरा समर्थकाने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.