Pandit Shiv Kumar Sharma : काश्मीरच्या पारंपरिक संतूर वाद्याचा नाद जागतिक स्तरावर पोहोचवणारे शिवकुमार शर्मा

Shiv Kumar Sharma : पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ रोजी जम्मूमध्ये झाला. त्यांचे वडील पंडित उमा दत्त शर्मा हे गायक आणि तबलावादक होते.

142
Pandit Shiv Kumar Sharma : काश्मीरच्या पारंपरिक संतूर वाद्याचा नाद जागतिक स्तरावर पोहोचवणारे शिवकुमार शर्मा
Pandit Shiv Kumar Sharma : काश्मीरच्या पारंपरिक संतूर वाद्याचा नाद जागतिक स्तरावर पोहोचवणारे शिवकुमार शर्मा

पंडित शिवकुमार शर्मा हे प्रसिद्ध संतूरवादक होते. संतूरला आज इतकं लोकप्रिय बनवण्याचं श्रेय त्यांनाच दिलं पाहिजे. त्यांनी चित्रपट क्षेत्रातही विशेष योगदान दिले आहे. ‘चांदनी’ चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चुडियाँ’ हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध गाणे आहे. पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shiv Kumar Sharma) आणि बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया (Pandit Hariprasad Chaurasia) यांची जोडी चित्रपट जगभरात शिव-हरी म्हणून ओळखली जाते.

(हेही वाचा – BMC : येत्या फेब्रुवारीमध्ये क्लिन अप मार्शल रस्त्यावर; करणार ऑनलाईन दंडाची रक्कम वसूल)

वयाच्या ५ व्या वर्षापासून शिक्षणाला सुरुवात

पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shiv Kumar Sharma) यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ रोजी जम्मूमध्ये झाला. त्यांचे वडील पंडित उमा दत्त शर्मा (Pandit Uma Dutt Sharma) हे गायक आणि तबलावादक होते. शिवकुमार ५ वर्षांचे असतानाच त्यांना वडिलांनी गाणं आणि तबला शिकवायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी संतूर हे स्थानिक वाद्य शिकायलाही सुरुवात केली.

शिवकुमार (Pandit Shiv Kumar Sharma) यांनी आपला पहिला कार्यक्रम १९५५ रोजी मुंबईत केला. संतूर हे वाद्य लोकप्रिय बनवण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते. शिवकुमार शर्मा हे संतूर वादक तर होतेच त्याचबरोबर ते एक चांगले गायक देखील होते. त्यांचा पहिला एकल अल्बम १९६० मध्ये आला होता. १९६५ मध्ये त्यांनी प्रसिद्ध हिंदी चित्रपट झनक झनक पायल बाजेसाठी नृत्य संगीताची रचना केली.

(हेही वाचा – Manoj Jarange यांना दिलासा; आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार)

पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार यांची जगप्रसिद्ध जोडी

बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया (Pandit Hariprasad Chaurasia) आणि पंडित शिवकुमार (Pandit Hariprasad Chaurasia) यांची जोडी तर जगप्रसिद्ध आहे. १९६७ पासून दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली आणि त्यांना लोक “शिव-हरी” या नावाने ओळखू लागले. दोघांनी मिळून ‘कॉल ऑफ द व्हॅली’ नावाचा शास्त्रीय अल्बम तयार केला. हा अल्बम भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात अजरामर झाला. यानंतर शिव-हरी जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

शिवकुमार यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना १९८५ मध्ये बाल्टिमोर, युनायटेड स्टेट्सचे मानद नागरिकत्व देखील मिळाले आहे. तसेच १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मविभूषण (Padma Vibhushan) पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मान करण्यात आला. १० मे २०२२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. (Pandit Shiv Kumar Sharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.