Mihir Kotecha : उमेदवाराची पार्श्वभूमी, कर्तृत्व तपासून मतदान करा; मिहिर कोटेचा यांचे नवमतदारांना आवाहन

नवमतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 'टींडर'सह अन्य डेटिंग ॲपचा आधार घेत जनजागृती सुरू केली आहे.

113
Mihir Kotecha : उमेदवाराची पार्श्वभूमी, कर्तृत्व तपासून मतदान करा; मिहिर कोटेचा यांचे नवमतदारांना आवाहन

पहिलेवहिले मतदान करण्याआधी आपापल्या मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रिंगणात उतरलेल्या उमेदवाराची पार्श्वभूमी तपासा, त्याचे कर्तृत्व लक्षात घ्या, असे आवाहन ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी नवमतदारांना केले. मुलुंड पश्चिमेकडील जे. के. शहा अकादमीत सोमवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात ‘सीए’च्या विद्यार्थ्यासोबत संवाद साधताना कोटेचा बोलत होते. (Mihir Kotecha)

नवमतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘टींडर’सह अन्य डेटिंग ॲपचा आधार घेत जनजागृती सुरू केली आहे. मात्र मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याझाल्याच ईशान्य मुंबईतील नवमतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे, ही जाणीव कोटेचा यांनी नवमतदारांना करून दिली. आपण निवडून दिलेले सरकार देशाचा कारभार चालवते. हे सरकार लोकहिताचे निर्णय घेते, पायाभूत सुविधा आणि अन्य विकासकामे करण्यास कटिबद्ध असते, अशी माहिती देत अधिकाधिक नवमतदारांना कोटेचा (Mihir Kotecha) यांनी नाव नोंदणी प्रक्रियेकडे आकर्षित करण्यासाठी धडपड सुरू केली. नाव नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी नोंदणी केंद्रही सुरू केली. (Mihir Kotecha)

(हेही वाचा – Delhi Liquor Scam: अरविंद केजरीवाल, के. कविता यांना कोर्टाचा दणका, कोठडीत वाढ)

पुढल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या नवमतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना प्रत्यक्ष मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न कोटेचा (Mihir Kotecha) करणार आहेत. जे के अकादमीत सोमवारी पार पडलेला कार्यक्रम त्याचाच एक भाग होता. सीएचा (चार्टर्ड अकांउंटंट) अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मतदार नोंदणी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तुमच्या बोटाला लागलेली शाई (मतदान केल्याची खूण) या देशाचं भवितव्य ठरवेल, त्यामुळे जबाबदारीने मतदान करा. प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, त्याचे आजवरचे राजकीय कर्तृत्व, त्याने केलेली विकासकामे अर्थात त्याची पार्श्वभूमी तपासा, माहिती घ्या आणि मग मतदान करा, असे आवाहन केले. (Mihir Kotecha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.