फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या याचिकेची कागदपत्रे गायब 

92

फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली असता त्याच्या वकिलाने त्यांच्या याचिकेचे कागदपत्रे सापडत नाहीत, याचिकेची कागदपत्रे पुन्हा मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल. चोक्सीने 2019 मध्ये याचिका दाखल करून सीबीआयने त्याच्यावर दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे सीबीआय आणि राज्य सरकारच्या कार्यालयातूनही ही याचिका गायब झाली आहे.

महत्वाच्या याचिकेची कागदपत्रे गायब कशी होतात? 

चोक्सीचे वकील राहुल अग्रवाल, सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले असता त्यांनी न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे आणि आर एन लड्डा यांच्या खंडपीठाला सांगितले की, लॉकडाऊन आणि कार्यालयाच्या स्थलांतरामुळे याचिका गायब झाली आहे. त्यामुळे याचिकेची कागदपत्रे मिळवण्यासाठी वेळ देण्यात यावा. सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारे हितेन वेणेगावकर यांच्याकडे ही याचिका आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली. वेणेगावकर यांनीही नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर खंडपीठाने अग्रवाल यांना एक दिवसाची मुदत देण्याचा निर्णय घेतला. अग्रवाल यांनी सांगितले की, आपण महाराष्ट्र अभियोक्ता कार्यालयातही गेलो होतो, परंतु त्यांच्याकडेही प्रत नव्हती. त्यामुळे त्याने आणखी काही वेळ मागितला. त्यावर न्यायमूर्ती सांबरे यांनी विचारले की, एवढ्या महत्वाच्या याचिकेची कागदपत्रे हरवणे तुम्हाला कसे परवडणार? न्यायमूर्ती सांबरे यांनी पुढे विचारले की, चोक्सी कुठे आहे? त्यावर वकील अग्रवाल यांनी ‘अँटिगा’ असे उत्तर दिले तर वेणेगावकर यांनी ‘मिसिंग’ असे उत्तर दिले. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.