Meera Borvankar: बिल्डरपासून पोलिसांपर्यंत भ्रष्टाचाराचा चौकोन ; मीरा बोरवणकर यांचा दावा

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या 'मॅडम कमीश्नर' या पुस्तकामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे

33
Meera Borvankar: बिल्डरपासून पोलिसांपर्यंत भ्रष्टाचाराचा चौकोन ; मीरा बोरवणकर यांचा दावा
Meera Borvankar: बिल्डरपासून पोलिसांपर्यंत भ्रष्टाचाराचा चौकोन ; मीरा बोरवणकर यांचा दावा

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बिल्डर, ब्युरोक्रेसी, राजकारणी आणि पोलिस यांनी आपसात हातमिळवणी केली असल्याचे चित्र देशात सर्वत्र बघायला मिळते आहे. अशात आपल्या मालकीची जागा सुरक्षित ठेवायची असेल तर नागरिकांनी जागरूक आणि सतर्क राहायला पाहिजे, असे मत माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी सोमवारी (१६ ऑक्टोबर) येथे व्यक्त केले. (Meera Borvankar)

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमीश्नर’ या पुस्तकामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. पुण्यातील येरवडा तुरूंगाची तीन एकर जागा एका बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी दादांनी दबाव टाकला होता, असा खुलासा बोरवणकर यांनी या पुस्तकात केला आहे. या खुलास्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रूपालीताई चाकणकर यांनी मीरा बोरवणकर यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याची ताकीद दिली आहे.मीरा बोरवणकर यांनी या मुद्यावर प्रेस क्लब आफ इंडिया येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पुण्यातील येरवडा तुरूंगाच्या प्रमुख असताना दादांनी तुरूंगाची तीन एकर जागा एका बिल्डरला हस्तांतरित करण्यास सांगितले होते. जागेचा लीलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यामुळे आपण ही जागा बिल्डरला हस्तांतरीत करावी, असे ते म्हणाले होते. (Meera Borvankar)

मात्र, ही जागा बिल्डरला हस्तांतरीत करता येणार नाही असे आपण दादांना सांगितले आणि का करता येणार नाही? हेही सांगितले. तर दादांनी यावेळेस तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबाबत अपशब्द काढले. ते मला येथे सांगता येणार नाही, असे बोरवणकर यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, जागेचा लीलाव करण्यासाठी नेमलेल्या समितीत गृह खात्याचे अधिकारी, पुण्याचे आयुक्त आदी सर्वांचा समावेश त्या समितीत होता. परंतु, पोलिस महासंचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी या समितीत नव्हते. ते का? असा प्रश्नही बोरवणकर यांनी यावेळी उपस्थित कला.

(हेही वाचा : MHADA Konkan Mandal Lottery : ऑनलाइन अर्ज करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ)

मुळात, पुण्यातील पोलिस स्टेशनच्या उजव्या डाव्या बाजूला बिल्डरची जागा होती. मधात पोलिस स्टेशन होते. हे पोलिस स्टेशन दुसरीकडे हलवावे आणि ही जागा बिल्डरला द्यावी. या बदल्यात बिल्डर दुसरी जागा आणि पोलिसांना घरे बांधून देण्याचे आश्वासन बिल्डरने दिले होते.मात्र, पोलिस खात्यालाच जागेची खूप गरज असल्यामुळे आपण ही जागा देण्यास नकार दिला होता. किंबहुना, लीलावाची प्रक्रिया सदोष असल्याचे मला जाणवले होते. असे नसते तर माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांनी ही जागा हस्तांतरीत का केली नाही? असा प्रश्न सुध्दा बोरवणकर यांनी उपस्थित केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.