Manipur Violence : अमित शाह मणिपूर दौऱ्यावर

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीदेखील तेथील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी शनिवार २७ मे पासून दोन दिवसांचा मणिपूर दौरा केला.

109
Manipur Violence : अमित शाह मणिपूर दौऱ्यावर

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील तणावाची स्थिती (Manipur Violence) कायम आहे. अशातच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा विविध भागात विद्रोही गट आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, रविवारी (२८ मे ) पहाटे, दोन वाजता इम्फाल घाटीत आणि तिथल्या आजूबाजूच्या पाच भागांमध्ये एकत्र हल्ला झाला. यादरम्यान आता मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेश सिंह यांनी राज्यात ४० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे. शिवाय काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध प्रति आणि बचावात्मक कारवाईचा भाग म्हणून करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti 2023 : …म्हणून नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला – रणजित सावरकर)

अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सोमवार २९ मे रोजी सकाळी मणिपूर (Manipur Violence) येथे दाखल होणार आहेत. त्यांनी मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीदेखील तेथील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी शनिवार २७ मे पासून दोन दिवसांचा मणिपूर दौरा केला.

हेही पहा –

ज्या दहशतवादी (Manipur Violence) समूहाविरोधात कारवाई केली गेली आहे, ते लोकं अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ले नागरिकांवर करत होते. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नाईपर गनचा वापर करण्यात येत आहे. हे दहशतवादी गावातील काही घरे जाळण्यासाठी आले होते. त्यालाच प्रत्युत्तर देताना लष्कर आणि इतर सुरक्षा दलाने गोळीबार केल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.