Mamata Banerjee यांचा मतदारयादीवरून थयथयाट सुरुच; निवडणूक आयुक्तांना लिहिले पत्र

96
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची सभा
तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी (West Bengal Assembly Elections) पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) यांना पत्र लिहून राज्यातील लोकशाही प्रक्रियेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे खऱ्या मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला आहे.

(हेही वाचा – इराणने झिडकारले, इस्रायलने फटकारले; मध्यस्थीच्या नाटकात Pakistan चा ‘गेम’ फसला; भारताची दावेदारी प्रबळ)

ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, बंगालमध्ये लोकांच्या लोकशाही हक्कांविरोधात एक मोठे षड्यंत्र रचले जात आहे. त्यांनी आरोप केला की भाजपाशी (BJP) संबंधित लोक हजारो बनावट फॉर्म-६ अर्ज सादर करून बाहेरील लोकांना मतदार यादीत (Electoral Roll) समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री म्हणाल्या की, ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे मतदार यादी ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न आहे.

त्यांनी दावा केला की, अशीच रणनीती यापूर्वी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही वापरण्यात आली होती. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजूनही ६० लाखांहून अधिक खरे मतदार पडताळणी प्रक्रियेत अडकले आहेत, तर मोठ्या प्रमाणावर बनावट अर्ज जलदगतीने स्वीकारले जात आहेत.

या प्रक्रियेमुळे आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादी नंतर कोणतेही नवीन नाव समाविष्ट करू नये, अशी त्यांनी मागणी केली. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने (Election Commission) तात्काळ हस्तक्षेप करून कथित गैरप्रकार थांबवावेत, अशी मागणी केली. बंगालची जनता आपल्या लोकशाहीला कोणत्याही परिस्थितीत कमकुवत होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.