मोहम्मद शारिकने न्यायालयात दिली कबुली; कसा झाला होता Mangalore Cooker Bomb Blast ?

86

मंगळुरू कुकर बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शारिक याने आपला गुन्हा कबूल केला आहे. (Mangalore Cooker Bomb Blast) बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने २०२२ मध्ये झालेल्या या स्फोटाबाबत शारिकने दाखल केलेला दोषसिद्धीचा अर्ज स्वीकारला आहे. एका नियोजित कटांतर्गत हा हल्ला करण्यात आला होता आणि हिंदू मंदिरांच्या आसपासचा परिसर हे या टोळीचे मुख्य लक्ष्य होते, हे आता स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा – एलपीजीच्या तुटवड्यावर Bombay IIT ने शोधला रामबाण उपाय; नव्या संशोधनामुळे पर्यायी इंधन उपलब्ध)

या प्रकरणाच्या सुरुवातीला काँग्रेस नेत्यांनी याला ‘क्षुल्लक घटना’ म्हणून तिचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरोपीच्या कबुलीजबाबाने आता कर्नाटक सरकारची बोलती बंद केली आहे.

(हेही वाचा – एलपीजीच्या तुटवड्यावर Bombay IIT ने शोधला रामबाण उपाय; नव्या संशोधनामुळे पर्यायी इंधन उपलब्ध)

सुरुवातीला शारिकने न्यायालयात स्वतःला निर्दोष म्हटले होते. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये त्याने सीआरपीसीच्या कलम २२९ अंतर्गत नवीन अर्ज दाखल करून आपला गुन्हा कबूल केला. न्यायालयाने आरोपीची ही कबुली नोंदवून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

डी.के. शिवकुमार यांनी केला होता बचाव

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी २०२२ मध्ये आरोप केला होता की, भाजप सरकारने जाणीवपूर्वक मंगळुरू कुकर बॉम्बस्फोटाला दहशतवादी घटनेचे स्वरूप दिले आहे.

शिवकुमार म्हणाले होते की, “मतदार डेटा चोरीच्या प्रकरणावरून लक्ष भरकटवण्यासाठी भाजपने ही खेळी केली आहे. भाजपकडे दाखवण्यासारखी कोणतीही उपलब्धी नाही, म्हणून राजकीय फायद्यासाठी भावना भडकावल्या जात आहेत.” त्यांनी सवाल केला होता की, “एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली असू शकते, पण ही घटना मुंबई, पुलवामा किंवा जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांसारखी दहशतवादी कारवाई होती का?”

काय आहे प्रकरण ?

१९ नोव्हेंबर २०२२ रोजी शिवमोगा येथील २७ वर्षीय मोहम्मद शारिक एका रिक्षातून सुमारे ३ किलो स्फोटकांनी भरलेला कुकर घेऊन जात होता. टायमरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कुकर त्याच्या मांडीवरच फुटला आणि शारिक गंभीर भाजला गेला. मंगळुरूच्या रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर एनआयएने (NIA) त्याला अटक केली.

एनआयएच्या माहितीनुसार, शारिक हा इस्लामिक स्टेटच्या (ISIS) शिवमोगा मॉड्यूलचा भाग आहे. सप्टेंबर २०२२ च्या शिवमोगा प्रकरणातही तो आरोपी होता, जिथे याच मॉड्यूलने आयईडी (IED) चाचणी केली होती. यापूर्वी मंगळुरूमध्ये देशविरोधी घोषणा लिहिल्याप्रकरणीही त्याला अटक करण्यात आली होती. (Mangalore Cooker Bomb Blast)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.